Nagpur News : शिशू स्वयंसेवकांनी संचलनातून दिला एकतेचा परिचय

राष्ट्राप्रती समर्पण, ताल व लयीचे भान ठेवून केलेले संचलन लक्षवेधक ठरले.
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे शनिवारी आयोजन करण्यात आले. शहरातील १२ भागामधील ३९ मैदानांवर एकाच वेळी उत्सवात शिस्तबद्ध संचलन अन् लयबद्ध प्रात्यक्षिकांमधून लहान मुलांमधील चैतन्य आणि जोश दिसून आला.

राष्ट्राप्रती समर्पण, ताल व लयीचे भान ठेवून केलेले संचलन लक्षवेधक ठरले.

उपराजधानीतील बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध व ऊर्जावान राष्ट्रसंस्कारांचा प्रत्यय शनिवारी सायंकाळी नागपूरकरांना आला. शहरात विविध ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महानगराच्या बाल व शिशू स्वयंसेवकांच्या शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे रेशीमबाग मैदानावर विजयादशमी उत्सव झाला. प्रारंभी शस्त्रपूजन झाले. सर्वच ठिकाणांवर सायंकाळी बाल स्वयंसेवकांनी प्रात्यक्षिके सादर केली.

यात लेझीम, योगासने, कवायती, दंडयोग, नियुद्ध यांचा प्रामुख्याने समावेश होता.

१२ भागात ३९ मैदानांवर आयोजन

nagpur
Nagpur News : काँग्रेसच्या गोटात वातावरण थंड, भाजप कार्यकर्त्यांत उत्साह; ३१ सरपंच पदांकरिता ११२ उमेदवारी अर्ज

शहरातील १२ भागांमधील ३९ मैदानांवर विविध टप्प्यांमध्ये या उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत पहिला टप्पा मागील आठवड्यात झाला. २१ आणि २२ ऑक्टोबरला दोन दिवस हा उत्सव विविध ठिकाणी होत आहे.

nagpur
Nagpur : एटीएसनंतर परवेझवर इनकम टॅक्सचा फेरा; बेहिशेबी मालमत्तेचा तपास; एटीएसची कारवाई

त्या अंतर्गत शनिवारी विवेकानंदनगर संघस्थान, मंगलदीपनगर क्रमांक एकचे मैदान, फ्रेंड्स को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी येथे उत्सव झाला. रविवारी (ता.२२) सरसंघचालक डॉ. मोहन भगवत यांच्या उपस्थितीत महाल येथील चिटणीस पार्कला सायंकाळी ५.३० वाजता, वाठोडा ले-आउटमधील स्वराज विहारला सायंकाळी ५.१५ वाजता, सहकार संघस्थानला सायंकाळी ४.४५ वाजता, एनआयटी मानव सेवानगरला सायंकाळी ४.३० वाजता, कॉर्पोरेशन कॉलनीला सायंकाळी ५.१५ वाजता, टिळकनगर संघस्थानला सायंकाळी ५.३० वाजता, खापरी पुनर्वसन येथे सायंकाळी ५.१५ वाजता उत्सव होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.