Nagpur News : दोन्ही रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा पुरेसा

शासकीय रुग्णालयांना नियमित औषध पुरवठा होत नसल्याने वेळोवेळी रुग्णांचा रोष सहन करावा
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर - नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औषधाच्या तुटवड्यामुळे एकाच दिवशी २४ मृत्यू झाले. या पार्श्वभूमीवर मेडिकल आणि मेयो रुग्णालयात अधिष्ठातांनी स्वतंत्र बैठक घेत मेयो आणि मेडिकलमध्ये पुरेसा औषध साठा असल्याची माहिती जारी केली. दरम्यान प्रत्येक रुग्णांना औषधं उपलब्ध करून देण्यात येतात. अपवादात्मक स्थितीमध्ये लोकल पर्चेस औषध खरेदीचीही व्यवस्था करण्यात येते. दरम्यान मेडिकलमध्ये सर्पदंशावरील इंजेक्शन वर्षभर पुरतील येवढा साठा असल्याची माहिती पुढे आली.

शासकीय रुग्णालयांना नियमित औषध पुरवठा होत नसल्याने वेळोवेळी रुग्णांचा रोष सहन करावा लागत असल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मेडिकलमध्ये दोन्ही रुग्णालयांमध्ये औषधांचा साठा पुरेसा

अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी बैठक घेतली. तर मेयोत प्रभारी अधिष्ठाता डॉ. राधा मुंजे यांनी देखील बैठक घेतली. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत शासकीय रुग्णालयांना लागणारी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्याचे अधिकार सहा वर्षापूर्वी हाफकीन महामंडळाला देण्यात आले होते. मात्र हाफकिन खरेदी धोरण राबवण्यात अपयशी ठरल्याने महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली. हे प्राधिकरण कार्यान्वित होईपर्यंत औषध खरेदीचे अधिकार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या आयुक्तांना देण्यात आलेत. मात्र अजूनही औषध पुरेसा पुरवठा सुरळीत झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

nagpur
Nagpur News : २४ तासांत मेडिकल-मेयोत २५ मृत्यू ;व्हेंटिलेटवरील रुग्णांना रेफरने वाढतो मृत्यूचा टक्का

या चाचण्या होत नाहीत !

मेयोची परिस्थिती बिकट आहे. येथे सोडियम, पोटॅशियम, कोलेस्टेरॉल, ट्रोपोनिल इत्यादी चाचण्या केल्या जात नाही. बाह्यरुग्ण विभागात तपासणी केल्यानंतर रुग्णांना औषधांचे प्रिस्क्रिप्शन दिले जाते. हीच परिस्थिती मेडिकलमध्येही आहे.

nagpur
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

केवळ २० टक्के औषधे दवाखान्यात किंवा वॉर्डात उपलब्ध आहेत. प्रसूती विभागात शस्त्रक्रियांच्या साहित्य थेट रुग्णांच्या नातेवाइकांच्या हातून मागवले जातात. मात्र मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुंजे यांनी अत्यावश्यक औषधांचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले. अपवादात्मक स्थितीत रुग्णांना बाहेरून औषध आणावे लागते.

nagpur
Solapur News : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावनणी न केल्यास शासनकर्त्यांना धनगर समाज त्यांची जागा दाखवेल

शासनाकडून जी काही औषधे दिली जातात ती रुग्णांना दिली जातात. बालरोग वॉर्डात पुरेशी औषधे आहेत. सध्या मेडिकलमध्ये ३ महिन्यांचा औषधांचा पुरवठा आहे. त्यामुळे रुग्णांनी घाबरून जाण्याची गरज नाही. डॉक्टरांकडून

नियमित व उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न असतो.

- डॉ.राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()