Nagpur News : आज घरात शिजविण्यासाठी धान्यही शिल्लक नाही

सहा महिन्यांपासून कंत्राटी वन कर्मचारी पगाराविना .
van vibhag
van vibhag sakal
Updated on

नागपूर - राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने युवा बेरोजगारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार वन विभागाच्या सेमिनरी हिल येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आणि इतरही कार्यालयातील चालक, डाटा ऑपरेटरचे पगार तब्बल सहा महिन्यापासून झालेले नसल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

एका मजुरांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यांपासून पगार न झाल्यामुळे आज घरात शिजविण्यासाठी धान्यही नाही. घरी जाऊन बायकोला काय तोंड दाखवू, तीला काय सांगू असा प्रश्न आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने मला राखी बांधण्यासाठी बोलविले होते.

van vibhag
Chandrakant Dada Patil: शालेय शिक्षणापासून वंचितांना ‘मुक्‍त’ने शिकवावे : मंत्री चंद्रकांत पाटील

मात्र, पगारच न झाल्याने तिला ओवाळणी देण्यासाठी पैसे नसल्याने कारण सांगून वेळ काढून नेली. बायकोचा भाऊ राखी बांधण्यासाठी आला होता. त्याने टाकलेल्या ओवाळणीतून थोडा फार किराणा खरेदी करून पोटाची खळगी भरली. आता तेही धान्य संपलेले आहे. आज पगार होईल अशी अपेक्षा होती. परंतु, निराशा झालेली आहे.

van vibhag
G20 Delhi: चीनचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीतल्या G20 परिषदेला येणार नाहीत; चीनकडून 'या' नेत्याचं नाव पुढे

रोज रोज कोणाला पैसे मागणार. आता मनही पैसे मागण्यासाठी धजावत नाहीत, अशी गंभीर अवस्था आहे. साहेब काय सांगावे आमचे दुःख. गावात शेती आहे. पण ती पिकत नाही म्हणून कामाला आलो तर येथेही तीच स्थिती. दोन दिवसांपासून अर्धपोटी झोपणे सुरू आहे.

मुलाचा चेहरा पाहिला की, डोळ्यात पाणी येते, अशी भावना व्यक्त करताना त्याचे डोळे पाणावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.