चहाटपरी हटविल्याने दिव्यांग तरुणाने केले असे...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

नागपूर : अतिक्रमणविरोधी पथकाने रविवारी चहाची टपरी हटवून साहित्य जप्त केल्याने संतप्त तरुणाने आज महापालिकेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे दुपारी महापालिका परिसरात चांगलीच खळबळ माजली. दरम्यान, आज महापौरांसोबत बैठक रद्द झाल्यानेही दिव्यांगांनी संताप व्यक्त केला. 

शहरात रविवारीही अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग आला आहे. काल, रविवारी गांधीबाग येथे दिव्यांग शेखर कुंभरे यांचे चहाचे दुकान अतिक्रमणविरोधी पथकाने हटविले. एवढेच नव्हे तर साहित्यही जप्त केले. त्यामुळे संतापलेल्या शेखर कुंभरे यांनी आज दुपारी महापालिकेत येऊन कारवाईविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला. शेखर कुंभरे यांनी अधिकाऱ्यांच्या नावाने बोट मोडत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अखेर यावेळी उपस्थित पोलिसांनी प्रसंगावधान राखत कुंभरे यांच्यापासून रॉकेल आदी जप्त केले. अखेर सकाळी महापौरांसोबत बैठकीसाठी आलेल्या इतर दिव्यांग बांधवांनी अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी आडकाठी निर्माण केल्याने दिव्यांगांनी पाटील यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. 

महापालिकेच्या एकूणच दिव्यांगविरोधी धोरणावरून त्यांनी घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून निघाला. रविवारी चहा ठेल्यामध्ये आवश्‍यक चहा, साखर आदी साहित्य ठेवले होते. त्यामुळे नुकसान झाल्याचे कुंभरे म्हणाले. आज सकाळी महापौर संदीप जोशी यांनी दिव्यांगासोबत बैठक बोलावली होती. परंतु, ही बैठक रद्द झाल्याने इतर दिव्यांगांनी नाराजी व्यक्त केली. महापौरांसोबत चर्चा होत नाही, तोपर्यंत दिव्यांगांच्या दुकानांवर कारवाई करू नये, अशी मागणी दिव्यांगांनी केली. महापालिकेच्या बससाठी बसस्थानकेही फूटपाथवर आहेत. मदत डेअरीचे स्टॉलही फूटपाथवर आहेत. तेही हटवावे, अशी मागणी विदर्भ विकलांग समितीचे गिरीधर भजबुजे यांनी केली. गेल्या दहा वर्षांपासून महापालिका दिव्यांगांना व्यवसायाच्या जागेसाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिव्यांगांच्या नावावर इतरांनी दुकाने थाटली, ती बंद करावी, अशीही मागणी त्यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.