Alcohol Consumption: मद्यप्रेमींनो सांभाळा! कोणताच ब्रॅंड सेफ नाही, मद्यपानामुळे महिन्याला दगावतात ४० जण

यकृत खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे अती मद्यसेवन असून मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये रोज दहा मद्यपी रुग्णांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात येते.
Alcohol Consumption
Alcohol Consumption Esakal
Updated on

Alcohol Brand Safety Daily 40 Dies: यकृत खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे अती मद्यसेवन असून मेडिकल, मेयो आणि एम्समध्ये रोज दहा मद्यपी रुग्णांना गंभीर अवस्थेत दाखल करण्यात येते. महिनाभराच्या उपचारात यकृतासह इतर अवयवांमध्ये गुंतागुंत वाढून या रुग्णालयांत ४० जण दगावत असल्याची माहिती पुढे आली आहे.

प्रारंभी मद्यपान आनंददायी वाटते. परंतु, हळूहळू व्यक्ती व्यसनात अडकते. मद्याबाबत ब्रँडला ''सेफ'' अर्थात सुरक्षित असल्याचा समज करून घेतला जातो. यामुळे व्यसन करणाऱ्यांचे सरासरी वयही कमी होत आहे. चाळीशीत या समस्येची तीव्रता वाढली आहे. मेडिकल, मेयो, एम्स या तिन्ही रुग्णालयात रोज गंभीर अवस्थेत अतिमद्यपान करणारे सुमारे १० रुग्ण दाखल होतात. उपचारानंतर काही बरे होतात.

दरम्यान डॉक्टरांकडून त्यांचे समुपदेशन होते. पुन्हा मद्यपान केल्यास जिवाला धोका असल्याचे सांगण्यात येते. पण ९० टक्के व्यक्ती अतिमद्यपान सुरू ठेवतात. नंतर पुन्हा- पुन्हा रुग्णालयात दाखल होतात. अतिमद्यपानाने अनेकांना लिव्हर सिरॉसिस होतो. यात यकृताचे विघटन होऊन ते घट्ट होते. (Latest Marathi News)

दारूचे परिणाम

शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते, मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो, हृदयविकार, स्ट्रोकची शक्यता,पचनसंस्थेच्या समस्या, रक्ताच्या उलट्या होतात, यकृताचे आजार वाढतात, मानसिक आरोग्यावर परिणाम, यकृतावर सूज येते, थकवा वाढतो, वजन कमी होणे, भूक न लागणे, मळमळ किंवा उलट्या, पोटात समस्या उदभवते

अतिमद्यपानामुळे काय होते ?

मद्यपानामुळे यकृत बहुतांशवेळा खराब, निकामी झालेले असते. त्याची जागा तंतू घेतात. यकृत कडक होते त्याचा आकारही अगदी लहान होतो. पूर्वी लिव्हर सिरॉसिस अतिमद्यपान करणाऱ्या व्यक्तीमध्येच आढळायचे. मेडिकल, मेयो एम्समधील एकूण लिव्हर सिरॉसिसच्या रुग्णांपैकी ७० ते ७५ टक्के रुग्णांचा इतिहास अतिमद्यपानाचा असतो.

Alcohol Consumption
Lok sabha Election: लालकृष्ण अडवाणी विरुद्ध राजेश खन्ना लोकसभा लढत; कोण जिंकलं? जाणून घ्या रंजक किस्सा

दारूचा कोणताही ब्रँड ''सेफ'' नाही. थोडंसेच मद्यपान करतो असाही विचार करू नका. तरुणींनी, गर्भवतींनी मद्याचा प्याला घेतला तर बाळाच्या शरीरात व्यंग निर्माण होण्याची, मतीमंदत्वाची वा आक्रमक वृत्ती येण्याची शक्यता असते. जितके जास्त मद्य सेवन, तितके बाळाचे नुकसान होते. गर्भपाताची शक्यता, वेळेपूर्वीच बाळ जन्माचा धोका असतो. यामुळे महिलांनी व्यसनापासून परावृत्त झाले पाहिजे.-डॉ. सुषमा देशमुख, ज्येष्ठ स्त्री व प्रसूतीरोग तज्ज्ञ, नागपूर.(Latest Marathi News)

आनंद व मनोरंजनाचे साधन म्हणून मद्यपान करतात. मात्र आपण केव्हा व्यसनाच्या विळख्यात सापडतो हे कळत नाही. अतिमद्यपानाने गुंतागुंत वाढून आजारपण येते. कौटुंबिक आयुष्यात वादविवाद, समस्या निर्माण होतात. त्या सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो. यात कौटुंबिक सदस्य, मित्रांची भूमिका महत्त्वाची आहे.-डॉ. निखिल पांडे, अध्यक्ष, मानसोपचार सोसायटी, नागपूर शाखा

Alcohol Consumption
Chakshu Portal : ऑनलाईन गुन्ह्यांवर राहणार सरकारची 'नजर'; तक्रार करण्यासाठी लाँच केले दोन नवीन प्लॅटफॉर्म.. जाणून घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.