Nagpur : OBC कार्यकर्त्यांच्या शिबिराला शरद पवार यांच्यासह अजित पवार हेसुद्धा उपस्थित राहणार

राष्ट्रवादीचे दोन दिवसीय ओबीसी अधिवेशन नागपुरात
 Sharad PawarAjit Pawar
Sharad PawarAjit Pawaresakal
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या शिबिराला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवार हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. रेशीमबागेतील महात्मा फुले सभागृहात तीन आणि चार जूनला हे शिबिर होऊ घातले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता.३) शिबिराचे उद्‍घाटन होणार असून समारोप शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. शिबिरात राज्यभरातून सुमारे सातशे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, ओबीसीचे राष्ट्रीय नेते शरद पवार व अजित पवारसुद्धा येणार व माजी मंत्री छगन भुजबळ, एकनाथ खडसे, राजेंद्र शिंगणे आदीही शिबिरात उपस्थिती लावणार आहेत. शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके, आमदार अमोल मिटकरी, ॲड. अंजली साळवे, धनगर युवा नेत्या सक्षणा सलगर, विकास लवांडे, अविनाश काकडे हे ओबीसींच्या विविध विषयांवर व सध्याच्या घडामोडींवर मार्गदर्शन करणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे आदी उपस्थित होते.

मराठा आरक्षण हा तांत्रिक विषय

शिंदेसेना-भाजप सरकारने मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून दहा टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादीचे समर्थन आहे का असा प्रश्न उपस्थित केला असता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना या बोलण्यास टाळले. ते म्हणाले हा तांत्रिक मुद्दा आहे. त्यावर नंतर बोलू असे सांगून या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.