Online Payment: ग्रामीण भागातही ऑनलाइन व्यवहार जोरात! अनेक दुकानात ‘क्यूआर कोड’ची चलती, पैसे बाळगण्याची चिंता मिटली

इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध तर झालीच पण डाटाही स्वस्त मिळत असल्याने आणि इंटरनेटचा वेगही जास्त असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे.
Online Payment: ग्रामीण भागातही ऑनलाइन व्यवहार जोरात! अनेक दुकानात ‘क्यूआर कोड’ची चलती, पैसे बाळगण्याची चिंता मिटली
Updated on

Nagpur Online Payment in Rural Area: इलेक्ट्रॉनिक साधने बाजारात उपलब्ध तर झालीच पण डाटाही स्वस्त मिळत असल्याने आणि इंटरनेटचा वेगही जास्त असल्याने शहरी भागातील डिजिटल रुपया आता ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे. आता पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी दूधवाल्याकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गेल्या पाच वर्षांत ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे . त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. संसारोपयोगी महागाचे साहित्य, विविध साहित्यांपासून अगदीच दहा, वीस रुपयांना मिळणारी वस्तू, खाद्यपदार्थ विकत घ्यायचे असले, तरी क्यू-आर कोड स्कॅन केला जात आहे.

रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण जेमतेम १० ते २० टक्के असून आता खिशात नव्हे, तर बॅंकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्यानुसार, ठराविक मुदत देऊन नागरिकांकडे असलेल्या ५०० आणि १००० च्या नोटा बँकामध्ये जमा करून घेण्यात आल्या आणि नंतर त्या चलनातून कायम बाद करण्यात आल्या. (Latest marathi News)

तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने ऑनलाइन व्यवहारास चालना मिळायला लागली. ऑनलाइन व्यवहाराला चालना देण्याची घोषणा शासनस्तरावरून करण्यात आली. सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून युद्धस्तरावर जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने घटून डिजिटल पेमेंटला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी.

Online Payment: ग्रामीण भागातही ऑनलाइन व्यवहार जोरात! अनेक दुकानात ‘क्यूआर कोड’ची चलती, पैसे बाळगण्याची चिंता मिटली
BCCI ची खेळाडूंना शेवटची वॉर्निंग! रणजी ट्रॉफी खेळली नाही तर भोगावे लागतील वाईट परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.