Patanjali Fruit Juice: संत्रा, मोसंबी ज्यूसची चव चाखायला मिळणार

मिहान येथील पतंजली प्रकल्पाचा आॅक्टोबरमध्ये होणार श्रीगणेशा
Patanjali Fruit Juice plant in vidarbha mihan
Patanjali Fruit Juice plant in vidarbha mihansakal
Updated on

Nagpur News : मिहानमधील रामदेवबाबा यांच्या पतंजली फुडपार्कमधील पीठ गिरणीपाठोपाठ आता संत्रा आणि मोसंबी पल्ब (ज्यूस कॉन्सट्रेट) प्रकल्पही आक्टोबरमध्ये सुरू होणार आहेत. ४०० टन संत्र्यावर पहिल्या टप्प्यात प्रक्रिया करून ज्यूस काढण्यात येणार आहे.

ज्यूस प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे. सप्टेंबर महिन्यापासून संत्रा आणि मोसंबी खरेदीचा श्रीगणेशा करणार आहेत.

मिहान विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील २३४ एकरांवरील फुडपार्क उभारण्यात येत आहे. तब्बल पाच वर्षानंतर पिठाचे युनिट सुरू झाले आहे.

त्यापोठापाठ आता संत्रा प्रक्रिया प्रकल्पही सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झालेले आहे. सर्वच मशिनही येथे आणण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात संत्रा ज्यूस असे तीन युनिट सुरू होणार आहे.

जगातील सर्वांत मोठा फुडपार्क उभा करण्यात येत असताना पतंजली समूह भविष्यात निर्यातदेखील करणार आहे.

विशेष म्हणजे निर्यातीचे पहिले युनिट मिहानमधील विशेष आर्थिक क्षेत्रात (सेझ) मध्ये उभे केले जाणार आहे. त्यासाठी ६० एकर जागा घेतली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या संत्राला चांगला भाव मिळावा म्हणून संत्रा ज्यूसचे उत्पादन करण्यात येणार आहे.

संत्रासोबतच मोसंबीचा ज्यूसही काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाची क्षमता दररोज ७०० टन संत्रावर प्रक्रिया करण्याची आहे. पहिल्या टप्प्यात ४०० टनावर प्रक्रिया केली जाणार आहे.

सेंद्रिय संत्री फक्त पतंजली खरेदी करणार आहे. त्यादृष्टीने आतापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहे. भविष्यात अजूनही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतकरी कंपन्यांकडून संत्री खरेदी करण्यात येणार आहे.

हा प्रकल्प वर्षभर चालावा म्हणून संत्रासोबत इतरही कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रकल्पात देशांतर्गत विक्रीसाठी विविध प्रकारचे उत्पादन तयार केले जाणार आहेत.

त्यात फ्रूट ज्यूस, भारतीय हिरव्या भाज्या, कॅंडी, मुरब्बा आणि लोणचे, पाचन गोळ्या, आयुर्वेदिक ज्यूस, टोमॅटो केचअप, कारले, आंबा आणि दुधीभोपळा ज्यूस, जॅम आणि सरबत तयार केले जाणार आहे अशी माहिती आहे.

पतंजली ज्यूस प्रकल्पाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आलेले आहे. आक्टोबर महिन्यापासून संत्रा पल्बच्या उत्पादनाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी सप्टेंबर महिन्यापासून संत्रा आणि मोसंबीची खरेदी करण्यात येणार आहे.

- मदन मोहन मास्टरगी, संत्रा ज्यूस प्रकल्प प्रमुख, पतंजली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.