Nagpur : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छकुलीने घेतली योगामध्ये झेप

छकुली फार गुणी, असंख्य पदकांची धनी !
Nagpur news
Nagpur newsesakal
Updated on

नागपूर : योगा हा मुख्यत्वे फिटनेस व व्यायाम प्रकार असला तरी, यात उज्ज्वल करिअरदेखील होऊ शकते. राष्ट्रीय योगपटू छकुली सेलोकरने आपल्या कामगिरीने ते सिद्ध करून दाखविले. छकुलीने गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णांसह चार पदके पटकावून वैदर्भी झेंडा फडकावला.

Nagpur news
Nagpur : रस्ते, बांधकामाची कामे रद्द

राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचा चौकार मारून अचानक प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या छकुलीला हे यश सहजासहजी मिळाले नाही. यासाठी तिला आर्थिक परिस्थितीशीही दोन-दोन हात करावे लागले. बहादुरा (दिघोरी) येथे राहणाऱ्या २१ वर्षीय छकुलीचे वडील (बन्सीलाल) हे खासगी चालक असून, आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती जेमतेम असूनही आई-वडिलांनी तिला काहीच कमी पडू दिले नाही. छकुली व योगपटू असलेल्या मोठ्या मुलीला त्यांनी खेळासाठी सतत प्रोत्साहन दिले. मुलींनीही योगामध्ये उंच झेप घेऊन आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज केले.

Nagpur news
Nagpur : स्मार्ट नागपुरातील नरक बघायचा असेल तर चला गोंड वस्तीत

अमित प्राथमिक शाळेचे क्रीडा प्रशिक्षक संदेश खरे यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या छकुलीने गेल्या दहा-बारा वर्षांच्या करिअरमध्ये अनेक मेडल्स व ट्रॉफीज जिंकून योगामध्ये ठसा उमटविला आहे. गुजरातमध्ये नुकत्याच संपलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने रिदमिक पेअर व आर्टिस्टिक ग्रुपमध्ये दोन सुवर्ण तसेच ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक सिंगलमध्ये दोन रौप्यपदकांची कमाई केली. याशिवाय बंगळूर येथे झालेल्या खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये रौप्यपदक, राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्ये चार रौप्य व चार ब्रॉंझपदके आणि नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशनच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन सुवर्णांसह चार पदकांची घसघशीत कमाई केली आहे. उल्लेखनीय म्हणजे सलग नऊ वर्षांपासून ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे.

Nagpur news
Nagpur : किलोमीटरच्या सक्तीने एसटी तोट्यात

छकुलीने योगाच्या माध्यमातून एका मराठी वाहिनीवरील ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्येदेखील कला सादर करून वाहवा मिळविलेली आहे. प्रियदर्शिनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. तृतीय वर्षात शिकत असलेल्या छकुलीने तिच्या आतापर्यंतच्या यशात आई-वडिलांसह प्रशिक्षक व शाळेचेही योगदान असल्याचे सांगितले. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी योगामध्ये नाव कमवू शकल्याचे तिने सांगितले. भविष्यात आई-वडिलांचे व क्लबचे नाव मोठे करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी पदक जिंकण्याची इच्छा तिने बोलून दाखविली.छकुली व योगपटू असलेल्या मोठ्या मुलीला त्यांनी खेळासाठी सतत प्रोत्साहन दिले. मुलींनीही योगामध्ये उंच झेप घेऊन आई-वडिलांच्या मेहनतीचे चीज केले.

Nagpur news
Nagpur : महालात रिद्धी-सिद्धी प्रकटल्या

योगासाठी खेळाडूमध्ये शारीरिक लवचिकता असणे खूप गरजेचे असते. छकुलीला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला तिच्यात लवचिकता दिसून आली. तिला योगासाठी प्रोत्साहित केले. देशभरातील अनेक स्पर्धां पदके जिंकून तिने माझा विश्वास सार्थ ठरविला. छकुलीतील टॅलेंट लक्षात घेता ती नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देईल, यात मला शंका नाही.

- संदेश खरे, छकुलीचे प्रशिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()