Nagpur: ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार उघड! बोगस विधवा लाभार्थी दाखवून घेण्यात आला घरकुलाचा लाभ

पांगरखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम घाटा येथील तीन बोगस विधवा लाभार्थ्यांची नावे घरकुल योजनेच्या अनुदानासाठी मालेगाव पंचायत समितीमार्फत अदा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nagpur: ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार उघड! बोगस विधवा लाभार्थी दाखवून घेण्यात आला घरकुलाचा लाभ
Updated on

Nagpur News: पांगरखेडा गट ग्रामपंचायत अंतर्गत ग्राम घाटा येथील तीन बोगस विधवा लाभार्थ्यांची नावे घरकुल योजनेच्या अनुदानासाठी मालेगाव पंचायत समितीमार्फत अदा करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत घाटा येथील शंकर दाभाडे यांनी तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे.


घाटा येथील तीन महिलांच्या नावे घरकुल योजनेचे अनुदान जमा करण्यात आले आहे. सदर तिन्ही महिलांचे पती हे जिवंत असताना त्या महिलांना चक्क विधवा महिला लाभार्थी म्हणून घरकुल योजनेचा लाभ मालेगाव पंचायत समिती मार्फत देण्यात आला. ऑनलाइन पोर्टलवर तीन महिला बोगस लाभार्थींच्या नावे हे अनुदान जमा करण्यात आले आहे.

खऱ्या विधवा लाभार्थ्यांवर हा अन्याय असून सदर प्रकरणाची तत्काळ सखोल चौकशी करावी व सदर प्रकरणातील दोषींवर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी घाटा येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव अमृता दाभाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

मालेगाव पंचायत समिती भ्रष्टाचारात आघाडीवर
मालेगाव पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये दोन ते तीन वर्षांपूर्वी "अर्ध्यात आम्ही, अर्ध्यात तुम्ही, रोजगार हमी" या मार्गाचा अवलंब करून अनेक गावांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सिद्ध झालेला आहे. मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. म्हणून मालेगाव पंचायत समिती ही भ्रष्टाचारासाठीच प्रसिद्ध आहे का, असा प्रश्न जनतेतून विचारल्या जात आहे. (Latest Marathi News)

Nagpur: ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार उघड! बोगस विधवा लाभार्थी दाखवून घेण्यात आला घरकुलाचा लाभ
Shivsena: खरी शिवसेना कोणाची? हे ठरवणे अध्यक्षांसमोरचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येणार निकाल

सदर तक्रार माझ्याकडे प्राप्त झाली असून तक्रारीनुसार चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. सदर समितीमध्ये विस्तार अधिकारी पळसकर, घरकुल ऑपरेटर खिल्लारे आणि अभियंता शेखर गायकवाड हे प्रत्यक्ष चौकशी करण्यासाठी जाणार आहेत. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे- कैलास घुगे, गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव (Latest Marathi News)

Nagpur: ग्रामपंचायतीमधील अजब प्रकार उघड! बोगस विधवा लाभार्थी दाखवून घेण्यात आला घरकुलाचा लाभ
Shivsena: खरी शिवसेना कोणाची? हे ठरवणे अध्यक्षांसमोरचे आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत येणार निकाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.