नागपुरात अवैध होर्डिंग्सवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा धूडगूस; अधिकाऱ्यांशी भिडले कार्यकर्ते, पोलिसांकडून दुर्लक्ष

संपूर्ण अवैध होर्डिंग्‍स व बॅनर काढण्याचे निर्देश दिल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत मनपा व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.
 नागपुरात अवैध होर्डिंग्सवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा धूडगूस; अधिकाऱ्यांशी भिडले कार्यकर्ते, पोलिसांकडून दुर्लक्ष
Updated on

Nagpur Municipal Corporation: हुडकेश्वर रोडवर लावलेल्या अवैध होर्डिंगवर कारवाईवरून सोमवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी धूडगुस घातला. अखेर प्रकरण मनपा आयुक्त व पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचले. त्यांनी संपूर्ण अवैध होर्डिंग्‍स व बॅनर काढण्याचे निर्देश दिल्यानंतर रात्री दोन वाजेपर्यंत मनपा व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.


हुडकेश्वर रोडवर माजीमंत्री सुनील केदार यांचे अवैध होर्डिंग व बॅनर लावण्यात आले होते. केदार यांच्याप्रमाणेच आमदार मोहन मते यांचेही काही होर्डिंग व बॅनर झळकले होते. सोमवारी हनुमाननगर झोनच्या अधिकाऱ्यांनी अवैध होर्डिंग्स काढण्याची कारवाई केली. यात सुनील केदार यांचे होर्डिंग काढण्यात आले. त्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घालत आमदार मते यांचेही होर्डिंग काढण्याची मागणी केली.

त्यामुळे हुडकेश्वर रोडवर केदार व मते समर्थक एकमेकांपुढे आल्याचे सूत्राने नमूद केले. वाद विकोपाला जात असल्याने काहींनी मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना फोन केला. एवढेच नव्हे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्यापर्यंतही प्रकरण गेले. मनपा आयुक्त डॉ. चौधरी यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तर पोलिस आयुक्तांनी हुडकेश्वर पोलिसांना दोन्ही नेत्यांचे अवैध होर्डिंग्स काढण्याचे निर्देश दिल्याची पुस्ती सूत्राने जोडली.

त्यानंतर रात्री साडेअकरा वाजताचा सुमारास पुन्हा अवैध होर्डिंग काढण्याची कारवाई करण्यात आली. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. हुडकेश्वर पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी प्रशांत माने यांनी या घटनेला दुजोरा दिला. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका कर्मचाऱ्यांशी वाद घातल्याचे त्यांनी सांगितले.(Latest Marathi News)

 नागपुरात अवैध होर्डिंग्सवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा धूडगूस; अधिकाऱ्यांशी भिडले कार्यकर्ते, पोलिसांकडून दुर्लक्ष
Sakal Podcast : आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकेल? ते मुंबईतील RBI चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी!

अधिकाऱ्यांकडून कारवाईची गुप्तता
दरम्यान, मंगळवारी या प्रकरणाबाबत महापालिकेच्या हनुमाननगर झोनच्या अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगली. कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने चक्क ‘मी त्यावेळी नव्हतो’, असे सांगितले. एका अधिकाऱ्याने ‘मी बाहेरगावी होतो’ असे सांगितले. मनपा सहाय्यक आयुक्तांनी फोन उचलण्याचे टाळले.

सहाय्यक आयुक्तांमुळे आयुक्तांना मनस्ताप
हनुमाननगर झोनचे सहाय्यक आयुक्तांकडून प्रकरण हाताळण्यात हयगय झाल्याचे एका अधिकाऱ्याने नमूद केले. त्यामुळे प्रकरण चांगलेच चिघळले अन् आयुक्तांपर्यंत गेले. आयुक्तांनी रात्रीच्या वेळी घरी असलेल्या अधिकाऱ्यांना परत बोलावावे लागले. सहायक आयुक्तांमुळे आयुक्तांसोबत रात्री कारवाईसाठी आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. (Latest Marathi News)

पोलिसांकडून दुर्लक्ष
उच्च न्यायालयाने अवैध होर्डिंगबाबत पोलिसांनी कारवाई करावी, असे आदेश पोलिसांनाही दिले आहेत. परंतु पोलिस याकडे दुर्लक्ष करीत नेहमी महापालिकेकडे बोट दाखवत असल्याचे एका मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका अवैध होर्डिंग शोधून यादी पोलिसांना देत असते. परंतु पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याची पुस्तीही या अधिकाऱ्याने जोडली.

 नागपुरात अवैध होर्डिंग्सवरून काँग्रेस कार्यकर्त्यांचा धूडगूस; अधिकाऱ्यांशी भिडले कार्यकर्ते, पोलिसांकडून दुर्लक्ष
१.३६ लाख शेतकऱ्यांना 'रब्बी'चे कर्जच मिळाले नाही! सोलापूर जिल्ह्यासाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट दोन हजार कोटींचे अन्‌ वाटप अवघे ५१५ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.