कोरोना मृतदेहांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी अटकेत

कोरोना मृतदेहांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी अटकेत
Updated on

नागपूर ः मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) कोरोनामुळे मृत (Corona deaths in Nagpur) झालेल्या मृतदेहाच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीला (Thieves gang) तहसील पोलिसांनी अटक केली. टोळीकडून १ लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गणेश उत्तम डेकाटे (२४) पार्वतीनगर, वांजरा ले आऊट आणि छत्रपाल किशोर सोनकुसरे (२५) जुनी मंगळवारी, ढिवर मोहल्ला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Nagpur Police arrested thieves gang from Mayo Hospital)

कोरोना मृतदेहांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी अटकेत
काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली गिरजाप्रसाद तिवारी (२२, राऊत ले आऊट, झिंगाबाई टाकळी) यांच्या वडिलांना कोरोना झाला होता. मेयोत उपचारादरम्यान १ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला. गिरजाप्रसाद तिवारी यांच्याकडे १८ हजाराचा मोबाईल होता. तिवारी यांच्या मृत्यूनंतर मोबाईल गायब झाला. अंजलीने सोमवारी तहसील पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

मेयो हॉस्पिटलमध्ये नेहमीच चोरीच्या घटना घडत असल्याने पीआय जयेश भांडारकर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. चौकशीत स्पिक अ‍ॅण्ड स्पॅन कंपनीचे कर्मचारी गणेश आणि छत्रपाल ड्युटीवर असल्याचे समजले. त्यांची विचारपूस केली असता तिवारी यांचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी तहसीलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, पंकज डवरे, यशवंत डोंगरे, क्रिष्णा चव्हाण आणि महिला शिपाई अश्विनी भामले यांनी केली.

कोरोना मृतदेहांच्या अंगावरील दागिने लुटणारी टोळी अटकेत
कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत

मजबुरीचा घेत होते फायदा

कोरोना रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे मृतकाचे नातेवाईक देखील जवळ येत नाहीत. मृतकाला बॉडी रॅपर चढवून स्मशानघाटपर्यंत तेच नेतात. या संधीचा फायदा घेत मृतदेहाजवळील मोबाईल, अंगावरील दागिने व इतर वस्तू काढून घेत असल्याची कबुली आरोपींनी दिली. २०२० मध्ये त्यांनी पाच चोर्‍या केल्याची कबुली देखील दिली.

(Nagpur Police arrested thieves gang from Mayo Hospital)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()