Nagpur: पासपोर्ट नूतनीकरणासाठी पोलिसांनी मागितली दोन हजारांची लाच, ACBने पोलीस ठाण्यातच लावला सापळा

पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज केल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन करून पाठविण्यासाठी दोन पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली.
Nagpur: पासपोर्ट नूतनीकरणासाठी पोलिसांनी मागितली दोन हजारांची लाच, ACBने पोलीस ठाण्यातच लावला सापळा
Updated on

Thane Police Bribe Trap by ACB: पासपोर्ट नूतनीकरणाचा अर्ज केल्यानंतर त्याचे व्हेरिफिकेशन करून पाठविण्यासाठी दोन पोलिसांनी दोन हजाराची लाच मागितली. यासंदर्भात तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने(एसीबी) हुडकेश्वर पोलिस ठाण्यातच सापळा रचून लाचखोर दोन पोलिसांना अटक केली. पोलिस हवालदार राहुल महाकुळकर आणि पोलिस शिपाई नितीन ढबाले अशी लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

तक्रारकर्ते हे ३२ वर्षांचे असून त्यांना पासपोर्टचे नूतनीकरण करायचे होते. त्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. आरोपी राहुल महाकुळकर आणि नितीन ढबाले हे हुडकेश्वर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर आहेत. पासपोर्टच्या पोलिस व्हेरिफिकेशनसाठी तक्रारकर्ते पोलिस ठाण्यात गेले होते. दरम्यान महाकुळकर यांनी व्हेरिफिकेशनकरीता दोन हजार रुपयांची मागणी केली. (Latest Marathi News)

मात्र, तक्रारदाराने नकार देत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारीची शहानिशा केली. तक्रारीत तथ्य आढळताच त्यांच्या मार्गदर्शनात एससीबी पथकाने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात सापळा रचला. महाकुळकर याने तक्रारदाराला बुधवारी पोलिस ठाण्यात पैसे घेऊन बोलाविले.

Nagpur: पासपोर्ट नूतनीकरणासाठी पोलिसांनी मागितली दोन हजारांची लाच, ACBने पोलीस ठाण्यातच लावला सापळा
Indian Coast Guard : भारतीय तटरक्षक दलात नोकरी कशी मिळवायची? मिळतो एवढा पगार

तक्रारदार पोलिस ठाण्यात आले असता महाकुळकर याने लाच रुपाने दोन हजाराची रक्कम शिपाई नितीन ढबाले याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ढबालेकडे पैसे देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक वर्षा मते, पोलिस निरीक्षक आशीष चौधरी, हवालदार अनिल बहिरे, आशू श्रीरामे, शिपाई अमोल मेंघरे, असलेंद्र शुक्ला यांच्या पथकाने केली. (Latest Marathi News)

Nagpur: पासपोर्ट नूतनीकरणासाठी पोलिसांनी मागितली दोन हजारांची लाच, ACBने पोलीस ठाण्यातच लावला सापळा
Rohit Pawar : रोहित पवारांची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी; पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()