CP Ravindra Singal: 'विद्यार्थ्यांनो, ज्ञानाची भूक कायम ठेवा', पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रत्येक नवीन दिवशी स्वतःमधे नवीन काहीतरी जोडायचा प्रयत्न करा, असा सल्ला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिला.
Nagpur
NagpurEsakal
Updated on

Police Commissioner Ravindra Singal: विद्यार्थ्यांनो,आयुष्यात कधीही हार मानू नका. नवीन कौशल्ये शिकत असताना आणि नवीन ज्ञान प्राप्त करताना वय ही फक्त एक संख्या आहे, जी तुम्हाला वेगाने बदलत असलेल्या जगाशी जुळवून घेते. ज्ञानाची भूक असलेले विद्यार्थी बना, कठोर अभ्यास करा, मित्र बनवा आणि प्रत्येक नवीन दिवशी स्वतःमधे नवीन काहीतरी जोडायचा प्रयत्न करा, असा सल्ला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिला.

एलआयटी विद्यापीठाच्या पहिल्या स्नेह संमेलन‘एलआयटी युनाईट- २४ ‘ च्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एलआयटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजू मानकर, मुख्य सल्लागार मोहन पांडे, एलआयटी माजी विद्यार्थी संघटना लिटाचे अध्यक्ष माधव लाभे, सचिव उत्कर्ष खोपकर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, एक सजग, बुद्धिमान, शारीरिकदृष्ट्या सृद्ढ व देशभक्त नागरिक बना. महाविद्यालयीन जीवनात अभ्यासेतर आणि फेलोशिप उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. यावेळी कुलगुरू डॉ. राजू मानकर यांचे भाषण झाले. (Latest Marathi News)

प्रास्ताविक मोहन पांडे यांनी केले. कार्यक्रमाला एलआयटी माजी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अजय देशपांडे, एलआयटी विद्यापीठाच्या सांस्कृतिक समन्वयक डॉ. शुभा दौतपुरे, कुलसचिव डॉ. नीरज खटी व विद्यार्थी विकास संचालक डॉ. नरेश पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी प्रथमेश कोलवाडकर, देवयानी हटवार, नारायणी आचार्य उपस्थित होते. व्यंकटेश आचार्य व मधुरा येरपुडे यांनी संचालन केले.

Nagpur
Most Powerful Indian: सर्वाधिक शक्तीशाली भारतीय ठरले PM मोदी; अमित शाह, योगी, राहुल गांधी कितव्या स्थानी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.