Nagpur : ‘एटीएम’मध्ये बॉम्ब असल्याची खबर देणाऱ्याला पोलिसांनी चांगला प्रसाद दिला; कारण...

कामठी पोलिसांची काहीकाळ तारांबळ उडविणारी घटना सोमवारी रात्री घडली.
Fake Bomb Call
Fake Bomb Callesakal
Updated on

कामठी - काही कारण नसताना पोलिसांना कामाला लावल्याची घटना कामठी येथे घडली असून अशाच एका रिकामचोटाला पोलिसांनी चांगलीच बत्ती दिली. आयसीआयसीआय बँकेच्या ‘एटीएम’मध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा फोन त्याने कंट्रोल रुमला केला होता.

Fake Bomb Call
Nagpur : ६५ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्त्या

कामठी पोलिसांची काहीकाळ तारांबळ उडविणारी घटना सोमवारी रात्री घडली. गांधी चौकाजवळील एटीएमच्या रूमचे भाडे न मिळाल्याने दुकान मालकाने सोमवारला दुकानाचे शटर बँकेला सूचना देऊन बंद केले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास येथील गणेश लेआऊट येथे राहणारा मुकेश मुन्नालाल बागडे (४७) याने कंट्रोल रूमला फोन करून केला.

Fake Bomb Call
Nagpur News : नागपुरातील विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीच्या कामाला लवकरच आरंभ - फडणवीस

‘एटीएममध्ये बॉम्ब ठेऊन शटर बंद करण्यात आले आहे’ अशी माहिती मुकेशने पोलिसांना दिली. फोन येताच पोलिसांनी एटीएमचा शोध घेतला. एटीएम असलेल्या दुकानाचे शटर बंद असल्याने दुकान मालकाला विचारपूस करण्यात आली. सत्यता तपासल्यानंतर फोन करणाऱ्याला संपर्क केला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

Fake Bomb Call
Mumbai Local Train Update : ऐन कामावर निघण्याच्या वेळेत रेल्वेने ट्रॅक बदलला! प्रवाशांनी रोखून धरली लोकल

त्याने पोलिसांना भेटण्यास नकार दिला. अखेर मोबाईल लोकेशनचा आधार घेत पोलिस बसस्थानकाजवळ पोहचले. मुकेश सुदाम टॉकीजच्या समोर पोलिसांना मिळाला. त्याला चांगला प्रसाद दिला. रस्त्यावर काय सुरू आहे हे लोकांना कळत नव्हते. मुकेश दारू पिऊन असल्याचे समजल्यानंतर त्याला मारहाण केली नाही. त्याच्याविरोधात कामठी पोलिसांनी १८२, १७७, ५०५ (१)(ब), ५०६(२) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.