Nagpur Crime : ओडिशातून नागपुरात आलेला साडेअठरा लाखाचा गांजा जप्त, आरोपींना अटक : सर्वच आरोपी रेकॉर्डवरचे

Nagpur crime : नागपूरातील जरीपटकातील आर्यनगर परिसरात १८ लाख ६२ हजार ४०० रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यातील सर्वच आरोपी रेकॉर्डवरचे आहेत.
Nagpur Crime
Nagpur Crime sakal
Updated on

नागपूर : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कारवाई करीत जरीपटकातील आर्यनगर परिसरातून १८ लाख ६२ हजार ४०० रुपयाचा गांजा गुरुवारी (ता.१९ ) रात्रीच्या सुमारास जप्त केला. याप्रकरणी पथकाने पाच आरोपींना अटक केली. तपासात ओडिशातील संबलपूर येथून शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आज येथे पत्रकर परिषदेत दिली.

उमरेखान अब्दुल रशीद खान (वय ३०), पत्नी दरक्षा अंजुम उर्फ राणू खान उमेर खान (वय २९, दोन्ही रा. कांजीहाऊस चौक, रमाईनगर), शेख रिजवान शेख युनूस (वय २४, रा. ईस्लामीक चौक, जुनी वस्ती बडनेरा, अमरावती), अब्दुल आरीफ वल्द अब्दुल खालीक (वय ३२, रा. आजरी माजरी बाबा दिवान मस्जिद जवळ, यशोधरानगर) मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी (वय ३१, रा. शिवनगर, यशोधरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दरक्षा वगळता सर्वच आरोपी हे रेकॉर्डवरील असून त्यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजाजन गुल्हाने आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, उमेर खान आणि त्याची पत्नी यांच्या गांजा विक्रीचा व्यवसाय करीत असून १९ तारखेला त्यांच्याकडे मोठी खेप येणार असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार, चौघांना सापळा रचून अटक केली. त्यांना विचारणा केली असता, फरार आरोपी मोहम्मद जुनैद आणि काशिफ अहमद (रा. ताजनगर, अमरावती, ह.मु., जाफर नगर) या दोघांच्या माध्यमातून ही गांजा तस्करी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली. त्यातून जुनैदला ताब्यात घेतले काशिफ फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

पथकाने त्याच्याकडून दोन वाहन आणि गांजा असा एकूण ४१ लाख २ हार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय पाटील, पोलिस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहायक पोलिस आयुक्त अभिजित पाटील आणि विविध पथकाचे प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.