नागपूर : सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या

प्रहार मिलिटरी स्कूलचा उपक्रम : शहरातील विविध शाळांचा सहभाग
Nagpur Prahar Military School send rakhi for border soldiers
Nagpur Prahar Military School send rakhi for border soldiers
Updated on

नागपूर : डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांसाठी प्रहार प्रहार मिलिटरी स्कूलच्या वतीने राख्या पाठविण्यात आल्या आहेत. स्कूलमध्ये झालेल्या राखी अर्पण कार्यक्रमात लष्करी अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे राख्या सोपविण्यात आल्या. सोमवारी दुपारी चार वाजता (१ ऑगस्ट) हा कार्यक्रम पार पडला.

सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये राखी तयार करून सैनिकांना पाठविण्याचा उपक्रम गेल्या कित्येक वर्षापासून घेतला जातो. सैनिक सीमेवर रात्रंदिवस कठीण परिस्थितीचा सामना करतो. त्यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सर्व भारतीय पाठिशी आहेत हे दर्शविण्यासाठी दरवर्षी राखी अर्पण समारंभ घेण्यात येतो.

प्रहारच्या बॅंडपथकाने प्रमुख अतिथींचे स्वागत केले. यावेळी ‘अमर जवान’ ला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गायनाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत येणाऱ्या आणि इतरही विविध शाळांनी तयार केलेल्या राख्या मेजर जनरल ए .पी .बाम (सेना मेडल, विशिष्ट सेवा मेडल), शाळेचे सचिव श्री अनिल महाजन ,श्री रमेश हिमते (सदस्य )सी पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी, यांनी लेफ्टनंट कर्नल एस मणिकंदन ए. पी .एस कामठी, मेजर बी प्रतापकुमार, नायब सुभेदार पी.आर.लाडे, सिपाही अनुरुल मोला यांच्या स्वाधीन केल्या.

राखी अर्पण कार्यक्रमात प्रमुख अतिथींनी भाषणात ‘प्रहार’च्या उपक्रमाची प्रशंसा केली. या कार्यक्रमास सी.पी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित हिमते, मुख्याध्यापिका वंदना कुलकर्णी उपस्थित होते. ‘सी.पी अँड बेरार’अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे प्रमुख, प्राचार्य, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘प्रहार’च्या सर्व सभासदांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला. विशाखा मंगदे यांनीसूत्रसंचालन केले आणि आभारही मानले. या कार्यक्रमात नागपुरातील सगळ्या शाळांनी एकूण ११,००० राख्या पाठवून सक्रिय सहभाग घेतला.

  • भिडे गर्ल्स हायस्कूल

  • अण्णासाहेब गोखले विद्या मंदिर, रवी नगर

  • बापूसाहेब कागभट, महाल

  • सी.पी अँड बेरार, तुळशीबाग

  • सी.पी अँड बेरार, रविनगर

  • के.डी.म गर्ल्स कॉलेज

  • ज्ञानदीप कॉन्व्हेंट, जयताळा

  • गायत्री कॉन्व्हेंट, हुडकेश्वर

  • गायत्री कॉन्व्हेंट, महाल

  • गायत्री कॉन्व्हेंट,नंदनवन

  • कुर्वेज न्यू मॉडेल पब्लिक स्कूल दीक्षाभूमी

  • आदर्श विद्यामंदिर श्रीमती कौशल्या देवी माहेश्वरी महिला महाविद्यालय इन्स्टिट्यूट

  • श्रीमती कौशल्यादेवी माहेश्वरी महिला महाविद्यालय, हिवरी लेआउट

  • श्रीमती विमला डॉ. लक्ष्मीनारायण सोनी हायस्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज, हिवरी लेआउट

  • श्रीमती सी. बी. आदर्श विद्यामंदिर हायस्कूल

  • श्रीमती जी.जी. सारडा हायर इंग्लिश स्कूल, गांधीबाग

  • श्रीमती गांधी इंग्लिश हायस्कूल, कापसी

  • मुंडले पब्लिक स्कूल जामठा

  • प्रहार मिलिटरी स्कूल, रविनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.