Nagpur : अध्यक्षपदाची धुरा पुन्हा येणार महिलेच्या हाती

रामटेक- सावनेर मतदारसंघातील जि.प. सदस्यांच्या नावाची चर्चा
Nagpur news
Nagpur newsesakal
Updated on

नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती येण्याची शक्यता आहे. गेल्या तीन टर्मपासून महिलाच अध्यक्षपदावर आहे. अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी (एस.टी.) आरक्षित झाले आहे. यामुळे अनेक इच्छुक दावेदारांचा हिरमोड झाला.आरक्षण जाहीर होण्यापूर्वी नागपूर जि.प.मध्येही उलटफेर होण्याची मोठी चर्चा होती. परंतु एस.टी.आरक्षणामुळे सर्वांचे राजकीय गणित बदलले.

Nagpur news
Nagpur : जयताळ्यात अतिक्रमण हटविताना तणाव

एस.टी. प्रवर्गातील कॉंग्रेसकडे ७ सदस्य तर भाजपकडे निता वलके या एक सदस्या आहे. कॉंग्रेस आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे. परंतु भाजपकडे एक सदस्य असल्याने निवडणूक होणार असल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसकडे सात सदस्य असले तरी रामटेक किंवा सावनेर विधानसभा मतदारसंघाकडे हे पद येणार असल्याची चर्चा आहे. या दोन्ही मतदारसंघातील महिलांकडून दावा केला जात आहे.

Nagpur news
Nagpur : प्रत्येकाच्या पूर्वजांनी चुका केल्या, आता जातीभेद संपायलाच हवा; मोहन भागवतांचं मोठं विधान

यापूर्वी भाजपच्या काळात दोन्हीवेळा अध्यक्षपद हे महिलांकडे देण्यात आले होते. पहिल्यांदा संध्या गोतमारे व त्यानंतर निशा सावरकर यांच्याकडे जबाबदारी होती. निशा सावरकर यांना तर पाच वर्षांचा कार्यकाळ मिळाला. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित असून रश्मी बर्वेंकडे धुरा आहे. गेल्या अडीच वर्षात प्रभावीपणे त्यांनी जबाबदारी सांभाळल्याचे चित्र आहे. गेल्या तीन टर्मपासून महिलाच अध्यक्ष असल्याने पुरुषाला संधी देण्याचा सूरही निघत आहे. त्यामुळे राजकीय गणिते लक्षात घेता शेवटच्या टप्प्यात बदल होण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nagpur news
Nagpur : आता ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मिळणार निधी

नेत्यांकडून चाचपणी

अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीबाबत शुक्रवारी कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, सुरेश भोयर यांनी सर्व सदस्यांची बैठक घेतली. त्यांच्याकडून पदाच्या निवडीबाबत मत जाणून घेतली. सर्वांनी पक्षादेश मान्य असल्याचे सूर काढला. गटबाजी टाळून सर्वांनी एकोप्याने राहण्याच्या सूचना नेत्यांनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.