Nagpur Hotel Pride Swimming Pool Death Case : हॉटेल प्राईडमधील स्वीमिंग पूलमध्ये पोहताना एका व्यापाऱ्याचा जुलै २०२३ मध्ये बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करावा या विनंतीसह हॉटेलचे महाव्यवस्थापक सुजितकुमार सिंह (वय ४६, रा. विद्यानगर, पुणे), एचआर व्यवस्थापक अमोल कोकाटे (वय ३९, रा. पीपळा, नागपूर) व अनुराग गुर्जर (वय ३३, चांदूर बाजार, जि. अमरावती) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.
सुशांत धोपटे (वय ५१, मेघरे ले आउट, मनीषनगर) असे मृताचे नाव होते. ते हॉटेल प्राइड येथील स्वीमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जात होते. ४ जुलै २०२३ रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास पोहायला गेले. सकाळी ९ वाजता स्वीमिंग क्लास संपल्यानंतर प्रशिक्षकाने निघण्याची इच्छा व्यक्त केली व तो कपडे बदलायला गेला.
दरम्यान, पोहत असताना धोपटे यांना चक्कर आली व ते पाण्यात बुडाले. प्रशिक्षक कपडे बदलून परतल्यावर धोपटे दिसत नसल्यामुळे त्याने शगुनला विचारले. शगुनने हाताने इशारा करत ‘आम्ही इथेच पोहत होतो’, असे सांगितले. प्रशिक्षकाने टॅंकमध्ये उडी मारत पाण्याखाली पाहताच धोपटे हे बुडालेले दिसले. (Latest Marathi News)
या प्रकरणात पोलिसांनी अगोदर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, चौकशीदरम्यान धोपटे यांनी स्विमिंगसाठी मेंबरशिप घेतल्याचे दिसून आले. तसेच अक्षय चतुरकर याच्याकडे कुठलेही अधिकृत प्रमाणपत्र नव्हते. तरीदेखील त्याला प्राईड हॉटेलचे महाव्यवस्थापक सुजितकुमार सिंह, एचआर व्यवस्थापक अमोल सदाशिवराव कोकाटे व अनुराग राजेंद्र गुर्जर यांनी कामावर ठेवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.