नागपूर - मुख्य रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे करण्यासाठी ३६ महिन्यांचे उद्दिष्ट ठेवून काम सुरू करण्यात आले. २४ महिन्यांचा कालावधी लोटूनही केवळ ३५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ‘वर्ल्ड क्लास स्टेशन’चे काम ‘लोकल’च्या गतीने सुरू असल्याचे वास्तव आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरील पार्किंगचा परिसर खोदण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.