Nagpur : उपराजधानीत रात्रभर धुवांधार; 9 तासांत तब्बल 121 मिलिमीटर पावसाची नोंद, वीजपुरवठा खंडित, घरांत शिरले पाणी

आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर आता विदर्भात परत एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.
Nagpur Rain Update
Nagpur Rain Updateesakal
Updated on
Summary

नागपूर शहरात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. पहाटे साडेपाचपर्यंत नऊ तासांमध्ये तब्बल १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

नागपूर : उपराजधानीत जोरदार पाऊस (Nagpur Rain Update) आणि वादळी वाऱ्यामुळं शहरातील अनेक भागात विजेचे खांब, झाड पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळं काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर, काही ठिकाणी घरात पाणी शिरुन मोठं नुकसान झालंय.

Nagpur Rain Update
Koyna Dam Update : कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृह केंद्राचा दरवाजा आज उघडणार; नदीकाठच्या गावांना इशारा

दरम्यान आज यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं उद्भवलेल्या पूरस्थितीनंतर आता विदर्भात परत एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. आज गुरुवार, २७ जुलै रोजी गडचिरोली व चंद्रपूरला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून नागपूरसह अन्य काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

Nagpur Rain Update
Almatti Dam : 'आलमट्टी'तून फक्त 15 हजार क्युसेक विसर्ग; महाराष्ट्राला मोठा फटका, जाणून घ्या कारण

नागपूर शहरात रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. पहाटे साडेपाचपर्यंत नऊ तासांमध्ये तब्बल १२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज नागपूरसह भंडारा, गोंदिया व यवतमाळ या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून प्रशासनाला पूर परिस्थितीच्या दृष्टिकोनातून सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याखेरीज अन्य जिल्ह्यांनासुद्धा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. शिवाय, हवामान विभागानं दिलेल्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज पाहता आज मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि चंद्रपूरमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Nagpur Rain Update
Koyna Dam Update: महापुराची धास्ती! महाराष्ट्राचं 'आलमट्टी'वर तर कर्नाटक शासनाचं 'कोयने'वर लक्ष्य; दोन्ही धरणांत किती आहे साठा?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.