Nagpur Rain: नागपूरकर पुन्हा पाण्यात! घराघरात पाणी, गावाला पावसाचा वेढा; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Nagpur Rain Update: नागपुरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
devendra fadanvis
devendra fadanvis
Updated on

Nagpur Rain: नागपूरसह विदर्भामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागाल पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. एकंदरीत जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करीत आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

devendra fadanvis
Mumbai Rain Update: मुंबईकरांसाठी आज पुन्हा मनस्तापाचा दिवस; तिन्ही लोकल सेवेकर काय झालाय परिणाम? नोकरदारांचे हाल

शाळांना सुटी देण्यात आली असून ज्या सखल भागात पाणी शिरले तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. कुही परिसरात काही रस्ते बंद झाले आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत, असं फडणवीसांनी सांगितलं.

नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीतील काही भागांचा संपर्क तुटला आहे. विभागीय आयुक्त सातत्याने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असं देखील ते म्हणाले. नागपूरच्या हुडकेश्वरच्या गणेश धाम परिसरात पाणी साचलं आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

devendra fadanvis
Nagpur Rain Update : नागपुरात धुवांधार, शहरात हाहाकार; अनेक भागात शिरलं पाणी, मोठ्या प्रमाणावर नुकसान!

पिपळा गावाला पाण्याचा वेढा

नागपूरमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार पावसाने हजेरी लावली आहे. प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली होती. नागपूरजवळील पिपळा गावाला पावसाच्या पाण्याने वेढा दिला आहे. गावात चार हजार नागरिक राहतात. संपूर्ण गावभर पाणीपाणी झालं आहे. लोकांच्या घरात, दुकानात पाणीच पाणी झालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com