nagpur rain update water entered the houses extensive damage traffic jam
nagpur rain update water entered the houses extensive damage traffic jamSakal

Nagpur Rain Update : नागपुरात धुवांधार, शहरात हाहाकार; अनेक भागात शिरलं पाणी, मोठ्या प्रमाणावर नुकसान!

नागपूर शहरासह ग्रामीण भागात पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या धुवांधार पावसामुळे शहरातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना फटका बसला.
Published on

Nagpur News : नागपूर शहरासह ग्रामीण भागात पहाटे पाच वाजल्यापासून सुरू झालेल्या धुवांधार पावसामुळे शहरातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना फटका बसला. नंदनवन झोपडपट्टी असो वा शहरातील पॉश वस्त्या अनेक भागातील घरे जलमय झाली.

आज पहाटेपासून शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. हळूहळू पावसाचा जोर वाढत असल्याने शहरातील अनेक सखल भागात असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. नंदनवन झोपडपट्टी, वाठोडा, पवनसुतनगर, विद्या नगर, श्रीकृष्ण नगर यांच्यासह पूर्व नागपूरच्या बहुतांश वस्त्यांमध्ये पाणी शिरले.

याशिवाय दक्षिण पश्चिम नागपुरात मनिषनगर, पडोळेनगर, दक्षिण नागपुरातील रामेश्वरी आणि इतर वस्त्या, उत्तर नागपुरात इंदोरा, जरीपटका, नारा परिसरात पाणी शिरले. पश्चिम नागपुरातही अनेक वस्त्या पाण्याखाली आलेल्या दिसू आल्यात.

विशेष म्हणजे, शहरातील प्रत्येक भागात उड्डानपुलाचे काम सुरू आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहे. यामुळे दररोज वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मात्र, आजच्या पावसाने शहरातील रस्तेही पाण्याखाली आल्याचे चित्र दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.