Nagpur : पावसाचा रब्बीला फायदा, खरिपामध्ये अनेकांचे नुकसान

हरभऱ्याचा पेरा यावर्षी वाढणार
rain news
rain newsesakal
Updated on

जलालखेडा : यावर्षी दमदार पाऊस पडला. त्यामुळे सर्व लहान-मोठे प्रकल्प, तलाव, नदी, नाले, विहिरी तुडुंब भरले. या पावसामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, आता रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिंचनासाठी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी गहू, हरभरा, तसेच अन्य पिकांकडे आता शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचा पेरा वाढविण्याची शक्यता आहे.

rain news
Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

नरखेड तालुक्यात संत्रा, मोसंबीसोबत कापूस, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. मागील हंगामामध्ये रब्बी हंगामात हरभरा, गहू या प्रमुख पिकांसह काही प्रमाणात भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली गेली होती. या हंगामात खरिपातील तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. यावर्षी हंगाम चांगला राहील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनसह खरिपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांची मदार आता रब्बी हंगामावर आहे. त्यामुळे रब्बीचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खरीपात पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांना तर दोन ते तीन वेळा पेरणी करावी लागली. यामध्ये त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

rain news
Nagpur : पंधराशे विद्यार्थ्यांसाठी एकच संस्था

मागील हंगामात हरभऱ्याचे एकरी उत्पन्न चांगले मिळाले होते. नाफेडने खरेदी केल्यामुळे बाजारापेक्षा दरही जास्त मिळाले. यावर्षीसुद्धा हमी भावाने खरेदी होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पेरा वाढण्याची शक्यता आहे. नरखेड तालुक्यात १० हजार हेक्टरमध्ये हरभऱ्याची पेरणी होण्याची शक्यता आहे.

rain news
Nagpur : कोळशाची आयात २०२५ पर्यंत थांबविणार : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी

रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

मागील वर्षी हरभरा, गहू पिकांचे चांगले उत्पादन झाले. दरही बऱ्यापैकी मिळाला. त्यामुळे या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. यावर्षी अति पावसामुळे खरिपातील पिकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी पिकांचा पेरा वाढेल. सिंचनाच्या रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ६,५५० हेक्टरमध्ये होणार पेरणी.

rain news
Nagpur : शुद्ध पाण्यासाठी ‘आप’चे निवेदन

गव्हाच्या पिकाला जास्त प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस पडल्याने गव्हाला पोषक वातावरण आहे. तसेच सिंचनाची ही अडचण होण्याची शक्यता कमी आहे. खर्च व उत्पादन या तुलनेत गव्हाला दर चांगले राहिल्यास हे पीक फायदेशीर ठरू शकते. याची नरखेड तालुक्यात ६५५० हेक्टरमध्ये पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. तालुक्यात रब्बीमध्ये गहू, हरभरासह अन्य पिकांची लागवड केली जायची. मात्र, योग्य बाजारभाव आणि पिकांची हमी नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा गहू, हरभरा या पारंपरिक पिकांकडेच आपले लक्ष केंद्रित केले आहे.

rain news
Nagpur : काटोल-नरखेडला एक्सप्रेसचा नियमित थांबा

खरिपामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, आदी पिके घेतली जातात. पण अति पावसाने याचे मोठे नुकसान झाले. यामुळे आता शेतकऱ्यांची आशा रब्बी हंगामावर आहे. हरभरा आणि गहू हेच रब्बी हंगामातील प्रमुख पीक आहे. शासनाने हरभऱ्याची हमीभावाने खरेदी केल्यास दर चांगला मिळेल.

-राजू रंगारी, शेतकरी, जलालखेडा

rain news
Nagpur : जन्मठेपेच्या आरोपातून प्रा.साईबाबा निर्दोष मुक्त

पावसाळा भरपूर झाल्याने व खरीप हंगामात झालेल्या अति पावसाने खरीप पीक बुडल्याने जमीन पडीत असल्याने यावर्षी गहू तसेच हरभऱ्याचा पेरा अधिक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमाणित अनुदानावर उपलब्ध असलेल्या बियाण्यांचा पेरणीसाठी वापर करावा व रब्बीचे योग्य नियोजन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.