Nagpur Ramtek Loksabha Constituency: रामटेक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. कॉंग्रेसच्या रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र ऐनवेळी रद्द केल्याने त्यांचा अर्ज बाद झाल्याने संपूर्ण देशात या मतदारसंघाची चर्चो होत आहे. त्यातच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे सभा घेणार आहे. काँग्रेसने संपूर्ण जोर लावला असता तरी मागील निवडणुकीत सर्व सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल तुमाने यांना आघाडी होती. त्यामुळे आता कॉंग्रेसपुढे आघाडी घेण्याचे तर शिवसेनेसमोर आघाडी कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
रामटेकमधून कृपाल तुमाने गेल्या निवडणुकीत विजयी झाले होते. यंदा त्यांचा पत्ता कापून कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले उमरेडचे आमदार राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघावर भाजपनेही दावा केला होता. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता.
मागील निवडणुकीत तुमाने यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा सव्वा लाख मतांनी पराभव केला होता. तुमाने यांना ५ लाख ९४ हजारांवर मते मिळाली होती. तर गजभिये यांना ४ लाख ५८ हजारांवर मते मिळाली होती. विशेष म्हणजे सर्व सहाही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेस कॉंग्रेसपेक्षा आघाडी होती.(Latest Marathi News )
सावनेर, उमरेड व काटोल विधानसभा मतदारसंघातही ते आघाडीवर होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघात दोन कॉंग्रेस व एका ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले होते. हिंगणा व कामठी विधानसभा मतदारसंघात एक लाखाचा टप्पा शिवसेनेने गाठला होता. यंदा ही जागा आपल्याकडे घेण्यासाठी कॉंग्रेसने पूर्ण जोर लावला आहे. तर जागा कायम ठेवण्यासाठी शिवसेनेकडून सर्व शक्ती पणाला लावण्यात आली.
रामटेक जिंकण्यासाठी कॉंग्रेसपुढेही आघाडी मिळविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. तर मागील वेळेचे मतदान कायम ठेवून त्यापेक्षा जास्त मते मिळविण्यासाठी शिवसेनेला मोठी कसरत करावी लागणार आहे.
अर्ज बाद करून महिलेवर अन्याय केल्याचा प्रचार रश्मी बर्वे यांच्याकडून होत आहे. याचा श्याम बर्वेंना किती फायदा होतो, तर कॉंग्रेसची मत खेचून आणण्यात राजू पारवेंना किती यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पारवेंना उमेदवारी दिल्याने भाजपमधील एक गट नाराज आहे. (Latest Marathi News )
तर तिकीट कापल्याने तुमानेही नाराज असल्याची चर्चा आहे. ती दूर करण्यात पारवेंना किती यश मिळते, यावरही विजयाचे गणित अवलंबून असल्याचे सांगण्यात येते.
रामटेक लोकसभा -२०१९
मतदार संघ कृपाल तुमाने किशोर गजभिये
काटोल ९०३६८ ६८१६५
सावनेर ८८११७ ८०१६६
हिंगणा १०५६०३ ७९६८४
उमरेड ९३६४८ ७०६७८
कामठी १२३८९५ ९९४३१
रामटेक ९३१९६ ७०११९
एकूण ५९४८२७ ४५८७३८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.