Ramtek Loksabha: रामटेक मतदारसंघात भाजप लढणार? शिवसेनेने आग्रह सोडला, उमेदवारांची चाचपणी

रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत हा मतदारसंघ शिंदे सेनेने सोडण्याची तयारी दर्शवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
Nagpur Political
Nagpur Political Esakal
Updated on

Ramtek Loksabha Constituency: रामटेक लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. शुक्रवारी दिल्ली येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीत हा मतदारसंघ शिंदे सेनेने सोडण्याची तयारी दर्शवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

महायुतीमध्ये ज्या जागावाटपांवरून पेच होता त्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. ही जागा शिवसेनेने आपल्याकडे कायम राहावी असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा होता. पूर्व विदर्भातील याच एकमेवर मतदारसंघात शिवसेनचा खासदार आहे. कृपाल तुमाने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेने सलग दोन वेळा जिंकला आहे.

भाजप-शिवसेना युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र या मतदारसंघात आता शिवसेनेचे फारसे कार्यकर्ते नाही. जिल्हा परिषद सदस्य, फारसे सरपंच नाही. याउलट स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे मोठे नेटवर्क आहे. हिंगणा आणि कामठी विधानसभा मतदारसंघात आमदार आहेत. काटोल, सावनेर आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपला मिळाली होती. त्यामुळे रामटेकसाठी भाजपने आग्रह धरला होता. शेवटी तो मान्य झाल्याचे समजते. त्यामुळे आता भाजप कोणाला उमेदवार देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

भाजपने निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वच मतदारसंघाचा सर्वे केला. विद्यमान खासदारांविषयी मतही या माध्यमातून जाणून घेतले आहे. या सर्वेचा अहवाल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी घेललेल्या बैठकीत ठेवण्यात आला होता. सर्वेतील निष्कर्ष बघून रामटेक मतदारसंघ भाजपला देण्यात आल्याचे ठरल्याचे कळते.

Nagpur Political
Barti Center : 'बार्टी'च्या स्पर्धा परीक्षा केंद्रांना टाळे? घोषणा 365 कोटींच्या निधीची; मंजूर फक्त 75 कोटी रुपये

अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये येथून तयारीला लागले आहेत. उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्याही नावाची चर्चा आहे. उमरेड विधानसभा लढलेले तसेच माजी नगरसेवक संदीप गवई संधीच्या शोधात आहेत. (Latest Marathi News)

Nagpur Political
Namaz on Road: पोलीस अधिकाऱ्याची मॉब लिंचिंग झाली असती; दिल्लीतील घटनेचा नवा व्हिडिओ आला समोर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.