नागपूर : आंतरराष्ट्रीय कॉलने खंडणीच्या धमक्या

सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बारावी नापास बनला सायबर गुन्हेगार
सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बारावी नापास बनला सायबर गुन्हेगार
सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बारावी नापास बनला सायबर गुन्हेगारsakal
Updated on

नागपूर : एका कंपनीच्या मॅनेजरला आफ्रिकन इथिओपिया देशातील कोडने सुरू होणारा व्हॉट्सॲप कॉल आला. त्यावरून ''दहा लाख रुपये दे, नाहीतर घरातील एक एकाचा मुडदा पाडेल’ अशी धमकी मिळाली. मॅनेजर घाबरला आणि त्याने लगेच वाडी पोलिसांशी संपर्क केला. आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप क्रमांकाने खंडणी आणि कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी असल्याने वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर अवघ्या तीन दिवसांत आरोपीच्या मुसक्या आवळून वाडी पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी परिसरात राहणारे एम. प्रशांत हे एका नामांकित कंपनीत डेप्युटी मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. त्यांना पत्नी, दीड वर्षांची मुलगी, आई-वडिल व भाऊ असे कुटुंब आहे. प्रशांत यांना लाखांमध्ये वेतन असल्यामुळे त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे. तसेच त्यांचा सोशल मीडियावर चांगला वावर आहे. त्यांना १८ ऑक्टोबरला दुपारी एक वाजता कार्यालयात असताना व्हॉट्सॲपर +१ (२५१) ४९४-६९८३ या क्रमांकावरून मॅसेज आला. मॅसेजमध्ये १० लाखांची खंडणी मागण्यात आली.

सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बारावी नापास बनला सायबर गुन्हेगार
नवले पुलाजवळ आठ दिवसांत चौथा अपघात; जीवित हानी नाही

२७ ऑक्टोबरपर्यंतची वेळ देण्यात आली. खंडणी न दिल्यास पत्नी व मुलीच्या जिवाला धोका असल्याची धमकी देण्यात आली. प्रशांत यांनी वाडी पोलिस स्टेशन गाठले व पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला. वाडी पोलिसांनी आरोपीचा शोध लावण्याकरिता सायबर क्राईममध्ये मदत मागितली.

सायबर विभागाने तक्रारीवर गांभीर्याने दखल घेतली. इथिओपिया या आफ्रिकन देशातील असल्याचे समोर आले. आफ्रिकन देशात बसून खंडणी मागितल्याची पहिलीच घटना असल्यामुळे पोलिसांनी व्हॉट्सॲप व्यवस्थापनाशी संपर्क साधून माहिती घेतली. सायबर क्राईमचे वपोनी फटांगरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक केशव वाघ, कृणाल हटेवार, सूर्यकांत चांभारे व दीपक चव्हाण यांनी अवघ्या तीन दिवसांत छडा लावला.

सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या; बारावी नापास बनला सायबर गुन्हेगार
शक्तिकांत दासच RBIचे गव्हर्नर; कॅबिनेटने तीन वर्षांसाठी वाढवला कार्यकाळ

सायबर खंडणीबाज शुभम तेलतुंबडे (वय २६, रा. कौशल्यानगर, अजनी) याच्या मुसक्या आवळून त्याला वाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयाने आरोपीला ३० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

खंडणीचे नागपूर कनेक्शन

खंडणी प्रकरणात सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी आरोपीच्या प्रॉक्झी व्हॉट्सॲप वरून आरोपींच्या खऱ्या मोबाईल नंबरची व त्याच्या फोनची अधिक माहिती गोळा केली. संपूर्ण तांत्रिक माहिती तपासली असता नागपूर कनेक्शन मिळाले. ज्या मोबाईलचा वापर करून आंतरराष्ट्रीय फोन कॉल करण्यात आला, त्या सायबर गुन्हेगाराचा छडा लागला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.