Nagpur University: नागपूर विद्यापीठात विद्यार्थी संघटनांचा राडा, नमो संमेलनाला जागा दिल्याने केलं होतं आंदोलन

एनएसयूआय, युवक कॉंग्रेस आणि युवा ग्रॅज्युएट फोरमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोर आंदोलन केले. कुलगुरूंना घेराव घालून घोषणाबाजी करीत चांगलाच राडाही घातला.
Nagpur University
Nagpur UniversityEsakal
Updated on

Student Organization Protest in Nagpur University: भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात आयोजित नमो युवा संमेलनाला जागा दिल्याच्या विरोधात सोमवारी (ता.४) दुपारी पुन्हा एनएसयूआय, युवक कॉंग्रेस आणि युवा ग्रॅज्युएट फोरमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुलगुरूंच्या कक्षासमोर आंदोलन केले. कुलगुरूंना घेराव घालून घोषणाबाजी करीत चांगलाच राडाही घातला.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने नमो युवा संमेलनासाठी जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात जागा देण्यास मान्यता दिली. त्यावरून शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रमाला मिळालेली परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी एनएसयूआय, युवक कॉंग्रेस आणि इतर संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. आज सोमवारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी विद्यापीठावर हल्ला बोल करीत, कुलगुरूंच्या कक्षासमोर आंदोलन केले.

यावेळी अधिसभा सदस्य राहुल हनवते यांच्यासह अतुल खोब्रागडे यांच्या नेतृत्वात युवा ग्रॅज्युएट फोरम आणि आशिष मंडपे यांच्या नेतृत्वात एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. कक्षासमोर घोषणाबाजी करीत राडा घातला. शिवाय प्रभारी कुलगुरू प्रशांत बोकारे यांना घेराव घालून त्यांना यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नांचे उत्तर मागितले. (Latest Marathi news)

मात्र, कुलगुरूंनी याबाबत मौन बाळगल्याने संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. परिणामी कुलगुरूंनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्यांना कक्षातून बाहेर काढत ताब्यात घेतले. युवक काँग्रेस महासचिव अक्षय हेटे, युवासेना जिल्हा विस्तारक विक्रम राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत तिवारी, युवती सेना जिल्हाप्रमुख अपूर्वा पित्तलवार आणि एनएसयूआय उपाध्यक्ष प्रणय ठाकूर यांच्यासह जवळपास पन्नास ते साठ विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सायंकाळी त्यांची सुटका केली. आंदोलनामुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीला छावणीचे स्वरूप आले होते.

Nagpur University
Rajnikanth On Anant Radhika Pre Wedding : 'अंबानींच्या लेकाचं प्री वेडिंग म्हणजे साक्षात...' सुपरस्टार रजनीकांत काय म्हणाले?

एनएसयूआयचा कार्यकर्ता जखमी

पोलिसांकडून एनएसयूआयसह इतर संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना एका कार्यकर्त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांकडून करण्यात आलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधही एनएसयूआयकडून करण्यात आला. (Latest Marathi news)

Nagpur University
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 किंवा 15 मार्चला होणार? 7 टप्प्यात पार पडणार मतदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.