Nagpur : संघ मुख्यालयाला घेरावाचा प्रयत्न फसला

उत्तर नागपूरला छावणीचे स्वरूप, वामन मेश्राम यांना अटक व सुटका
Nagpur
Nagpur sakal
Updated on

नागपूर : भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी बेझनबाग येथील मैदानात सभा घेण्याचे आवाहन केले होते. सभेला पोलिसांसह न्यायालयाने परवानगी नाकारली असताना बेझनबागसह इंदोरा परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने वामन मेश्राम यांच्यासह पाच हजारावर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे संघ मुख्यालयाला घेराव्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र आल्याने इंदोरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काही दिवसांपूर्वी वामन मेश्राम यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याबाबत एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यांनी पोलिसांना मोर्चाची परवानगीही मागितली. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारली. याविरोधात संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने परवानगी नाकारली.

मात्र, त्यानंतरही बेझनबाग येथे सभा घेत संघ मुख्यालयावर मोर्चा काढण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना सोशल मिडियावर आवाहन करण्यात आले त्यानुसार पोलिसांनी जरिपटकासह कोतवाली आणि इतर चार परिसरात १४४ कलम लागू केले. मात्र, सकाळी १० वाजतापासून देशभरातून संघटनेचे कार्यकर्ते इंदोरा परिसरात एकत्र येऊ लागले. पोलिसांनी सकाळीच वामन मेश्राम यांच्यासह पाच जणांना हुडकेश्‍वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ताब्यात घेतले. ही माहिती कार्यकर्त्यांनी मिळताच, त्यांनी परिसरात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे बारा ते एक वाजताच्या सुमारास इंदोरा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात येणाऱ्यांना जमावबंदी कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले. त्यांना गिट्टीखदान येथील अलंकार सभागृहात नेण्यात आले. यानंतर एका व्हिडीओच्या माध्यमातून वामन मेश्राम यांनी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगून आंदोलन रद्द करण्याची माहिती दिली.

साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त

पोलिसांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड, बसवराज तेली यांच्यासह सर्व शाखांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह राज्य राखीव दलाच्या १० तुकडी, जलद कृती दलाच्या (क्युआरटी) ४ तुकडी आणि साडेचार हजार पोलिसांचा बंदोबस्त लावला होता.

मेश्राम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

भारत देशाचे संविधान बद्दलविण्याचा कट आरएसएसच्यावतीने केला जात आहे. असे वक्तव्य कित्येक वर्षांपासून वामन मेश्राम यांच्या वतीने केले जात आहे. हे पूर्णतः चुकीचे असून दिशाभूल करणारे आहे. संविधानात संशोधन होते. मात्र ते बदलविल्या जाऊ शकत नाही, असे मत माजी सहायक सरकारी वकील भगवान महादेव लोणारे यांनी व्यक्त केले. मेश्राम यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ॲड. लोणारे यांनी केली आहे.

वामन मेश्राम यांना अटक आणि सुटका

सकाळी घरात असलेले वामन मेश्राम यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. त्यांना जरीपटका पोलिस ठाण्यात नेत अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना सायंकाळी सोडण्यात आले. दरम्यान परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. पाच जणांना पोलिसांनी अटक करून जरिपटका पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल केला.

संघ मुख्यालयात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

पोलिसांनी महाल येथील संघ मुख्यालय परिसरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लावली होती. संघ कार्यालयाच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले होते. याशिवाय येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जात होती.

धम्मचक्र प्रवर्तन दिन पवित्र दिन आहे. देशातील लाखो लोक येथे येतात. कधीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. येथे येणाऱ्या लोकांना राजकीय फायदा घेणे योग्य नाही. आंदोलन होणार नाही, असे न्यायालयाने आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी कारवाई केली.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.