दुसऱ्या लाटेनंतर सर्वांत कमी रुग्ण; शहरात १४२, ग्रामीणमध्ये ५७ कोरोनाबाधित

coronavirus recovery rate
coronavirus recovery rateGoogle
Updated on

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (The second wave of corona) उद्रेक शिगेला पोहोचला होता. प्रत्येकाल जीवाचा घोर लागला होता. मात्र, महिनाभरात ही लाट ओसरली. नागपूर जिल्ह्यत २४ तासांत १२ कोरोनाबाधित दगावले. तर २०३ नवीन बाधितांची भर पडली. दुसऱ्या लाटेनंतर दिवसभरात सर्वात कमी आढळून आलेले रुग्ण अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात जिल्ह्यात ५ हजार ६१९ सक्रिय कोरोनाबाधित (Active corona patient) आहेत. यातील १ हजार ७१७ जण मेयो, मेडिकलसह विविध कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर उर्वरित ३ हजार ९०२ कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. (Nagpur-recorded-the-lowest-number-of-patients-after-the-second-wave)

जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सरुवात झाली. मार्चनंतर उद्रेक सुरू झाला. रुग्णांना सरकारी आणि खासगी रुग्णालयात खाट मिळत नव्हते. तर ऑक्सिजनची सोय नसल्याने रग्णांचे जीव रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर गेले. रेमडेसिव्हिरपासून तर फॅबी फ्लू औषधांचा काळाबाजार सुरू झाला. मात्र, जिल्हा प्रशासनाने विविध उपाय योजना करीत कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणली. सद्या कोरोनाचा प्रभावही ओसरला.

coronavirus recovery rate
वाघाचा थरार! एकाला मानेला पकडून नेले ओढत, तर दुसऱ्याला झाडावरून खेचले खाली

मंगळवारी शहरात केवळ १४२ कोरोनाबाधित तर ग्रामीण भागात अवघे ५७ जणांना कोरोनची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. जिल्ह्याबाहेरील ४ अशा एकूण २०३ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ३१ हजार १९८ झाली आहे. तर ग्रामीण भागात १ लाख ४२ हजार ५३ कोरोनाबाधित आढळले.

जिल्ह्याबाहेरील १ हजार ५५७ कोरोनाबाधितांना नागपुरात रेफर केले. अशा एकूण एकूण ४ लाख ७४ हजार ८०८ कोरोनाबाधितांची नोंद नागपुरात झाली. तर दिवसभरात शहरात ६, ग्रामीण भागात २, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण १२ कोरोनाबाधित नागपुरात दगावले आहेत. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील मृत्यूची संख्या ५ हजार २४९, तर ग्रामीण भागातील २ हजार २९०, जिल्ह्याबाहेरील १ हजार ३७५ अशी एकूण ८ हजार ९१४ झाली आहे.

coronavirus recovery rate
प्रेमप्रकरण, पूर्ववैमनस्यातून दोघांचा खून; यवतमाळी जिल्ह्यातील घटना

कोरोनामुक्तांचे प्रमाण ९७ टक्क्यांजवळ

शहरात ६ हजार ८५९, ग्रामीण भागात ३ हजार ६८६ अशा एकूण जिल्ह्यात १० हजार ५४५ संशयितांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील २०३ जण बाधित आढळले. तर शहरात दिवसभरात ४५७, ग्रामीण भागात ३७६ असे एकूण जिल्ह्यात ८३३ व्यक्तीनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या ३ लाख २३ हजार १३, ग्रामीणला १ लाख ३७ हजार २६२ अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख ६० हजार २७५ झाली आहे. आजपर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण ९६.९४ टक्के अर्थात ९७ टक्क्यांजवळ पोहोचले आहे.

(Nagpur-recorded-the-lowest-number-of-patients-after-the-second-wave)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()