नागपूर : सणासुदीत चिकनगुनिया, डेंगीपाठोपाठ स्वाइन फ्लूची दहशत वाढली आहे. महानगरपालिकेच्या नोंदीनुसार नागपुरात आतापर्यंत १६१ स्वाइन फ्लू बाधित आढळले असून १५ मृत्यू झालेत. मनपाकडे या रुग्णांवर उपचाराची यंत्रणाच नाही. केवळ जनजागृती करून स्क्रिनिंग सुरू आहे. १७ स्वाइन फ्लू बाधित रुग्णालयांमध्ये उपचाराधीन आहेत. यात शहरातील १० रुग्ण आहेत.
साथीच्या आजारावरील उपचाराची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु केवळ जागृती करणे हाच अजेंडा घेऊन नागपूर महापालिका काम करीत आहे. अवघ्या चार महिन्यात ६२० रुग्ण आढळले. याच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, ही समाधानाची बाब आहे. मात्र स्वाइन फ्लूचे नागपूर शहरातील ४ आणि ग्रामीण भागातील ४ मृत्यूची नोंद महापालिकेच्या डेथ ऑडिट कमिटीने केली आहे. डेंगीचे १३४ रुग्ण आढळले आहेत.