Sand Smuggling in Nagpur : एकीकडे लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने महसूल प्रशासनाकडे निवडणुकीचे कामकाज असतानासुद्धा धामणगावचे तहसीलदार गोविंद वाकडे यांनी चिंचोली वाळूघाटावर बुधवारला (ता.२०) अचानक धाड टाकली व वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या चार ड्रमच्या बोटी नष्ट केल्या. या कारवाईमुळे वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने महसूल प्रशासन निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त आहे. दरम्यान तालुक्यातील वर्धा नदीपात्रातील चिंचोली वाळूघाटावर धामणगावचे तहसीलदार गोविंद वाकडे यांनी पथकासह बुधवारला (ता.२०) अचानक धाड टाकली व वाळूचा अवैध उपसा करणाऱ्या चार ड्रमच्या बोटी नष्ट केल्या.
सदर कारवाई तहसीलदाराच्या मार्गदर्शनात मंडळ अधिकारी श्री. कांबळे, तलाठी अनिल धुळे, आकाश चव्हाण, विनोद मस्के, कोतवाल संजीव इरपाते, योगिराज फुसाटे, ऋषिकेश देशमुख, आकाश काळे, कुणाल कुंभारखाते, आश्विन राठोड, अमोल खंडारे या महसूल विभागाच्या पथकाने केली. दरम्यान तालुक्यातील वाळूघाटांवर अनेक दिवसांपासून वाळू माफियांच्या नजरा खिळल्या आहेत. परंतु पथकाने ही कारवाई केल्याने वाळूतस्करांचे धाबे दणाणले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.