नागपूर : ब्रिटिशांचे आगमन होण्यापूर्वी भारतात शिक्षणाचे माध्यम संस्कृत भाषा होती. प्राचीन भारतीय ज्ञान आणि चिंतन ग्रंथांची भाषा संस्कृतच होती. विश्वात आज ज्या समस्या आहेत त्यांचे समाधान भारतीय ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. दुर्देवाने संस्कृत भारतातच उपेक्षित राहिली.
त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती राहू नये म्हणून संस्कृत भाषा दारादारांत पोहचावी, यासाठी संस्कृत भारती कार्यरत असल्याचे संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीश देवपुजारी यांनी ‘सकाळ’शी संवाद साधताना सांगितले.
संस्कृत मूळ भारतीय भाषा असली तरी तिचा प्रचार आणि प्रसार देशात झाला नाही. वास्तविक पाहता या भाषेतील ग्रथांमध्ये विपूल ज्ञान दडलेले आहे. पण केवळ भाषेच्या अभावामुळे लोकांपर्यंत पोहचलेले नाही. याचाच एक प्रयत्न म्हणून संस्कृत भारती कार्य करीत आहे.
ज्ञानोपासना आणि प्रचारात विद्यार्थी महत्वाचा घटक असल्याने नागपूर शहरात २७ ते २९ जानेवारीदरम्यान तीन दिवसांचे विद्यार्थी संमेलनाचे आयोजन केले आहे. ‘संस्कृताय जीवनम्।’ असे या संमेलनाचे घोषवाक्य आहे, अशी माहिती देवपुजारी यांनी दिली.
कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी श्रीश देवपुजारी यांचे स्वागत केले. यावेळी संस्कृत भारतीचे नागपूर अध्यक्ष प्रा. मोहन खेडकर, महानगर प्रचारप्रमुख विनया बोधनकर उपस्थित होते.
संस्कृत भाषा दारात पोहचावी
२७ जानेवारीला भट सभागृहात सकाळी ९ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रात्री नऊ वाजता लघुचित्रफितींचे स्कीनिंग होणार असून सर्वोत्कृष्ट लघुचित्रफितींना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
२८ जानेवारीला दुपारी संमेलनस्थळापासून शोभायात्रा काढण्यात येईल. ‘वॉक फॉर संस्कृत’मध्ये सर्व संस्कृतप्रेमी सहभागी होतील.
रात्री सव्वानऊ वाजता एक अंकी संस्कृत नाटकाचा प्रयोग होईल. २९ ला समारोप होईल. तीन दिवसांच्या काळात सकाळी ९ ते रात्री ८ या काळात संस्कृत प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आली असून ती सर्वांसाठी खुली राहील.
माजी न्यायमूर्ती शरद बोबडे, खासदार तेजस्वी सूर्यांची उपस्थिती
तीन दिवसीय संमेलनाला अध्यक्ष म्हणून माजी न्यायमूर्ती शरद बोबडे उपस्थित राहणार आहेत.
तसेच स्वामी गोविंदगिरीजी, बंगळुरचे युवा खासदार तेजस्वी सूर्या यांची कार्यक्रमाला उपस्थिती असेल. कार्यक्रमाला देशभरातील ४० प्रांतातील १२०० विद्यार्थी संमेलनात सहभागी होत आहेत.
देशात १७५८ तर विदेशात ४० केंद्र
संस्कृत भारतीचे देशभरात १७५८ तर विदेशात ४० केंद्र आहेत. देशात एकुण ३४१६ गावांमध्ये संस्कृतचे वर्ग घेतले असून त्यामधून २७८२३ विद्यार्थी शिकत आहेत.
दूरस्थ शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून २९८९९ विद्यार्थी संस्कृतचे धडे गिरवित असल्याचे देवपुजारींनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.