नागपूर : बार्टीच्या धर्तीवर सारथी आणि महाज्योती संशोधन प्रशिक्षण संस्था शासनाने स्थापन केल्या. अल्पावधीत सारथी आणि महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या फेलोशिपमध्ये विद्यार्थी संख्येचा आकडा बार्टीपेक्षा फुगला. जे बार्टीला १० वर्षांत जमले नाही, ते सारथी आणि महाज्योतीने अल्पावधीत करून दाखवले.
सारथीने अवघ्या चार वर्षांत २ हजार १३२ विद्यार्थ्यांना तर महाज्योतीने २ हजार ४२ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. मात्र १० वर्षांत बार्टीने १ हजार ४०२ विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली, मात्र यातील ८६१ विद्यार्थ्यांची फेलोशिप अद्याप रखडलेली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (बार्टी) स्थापना २०१२ मध्ये झाली. २०१२ मध्ये ५ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. यानंतर सातत्याने फेलिशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभ मिळू लागला. दरवर्षी निधी मंजूर करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात लाभ दिला जात नसल्यामुळे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
१४०२ लाभार्थ्यांपेकी ८६१ जणांना अद्याप या फेलोशिपचा लाभ मिळाला नाही. उलट सारथीअंतर्गत फेलोशिपच्या ८०० जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र प्रत्यक्षात २ हजार १३२ विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली. यामुळे वाढीव १ हजार ३३२ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यासाठी निधीची तरतूद शासनाने केली.
महाज्योतिअंतर्गत पूर्वी ५०० आणि नंतर २०० अशा ७०० जागांसाठी जाहिरात प्रकाशित केली. मात्र प्रत्यक्षात २ हजार ४२ जणांना फेलोशिप दिली. महाज्योतीअंतर्गत १ हजार ३४२ अतिरिक्त विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली, यासाठी शासनाने निधी दिली, मात्र बार्टीच्या बाबतीत शासनाची पक्षपाती भूमिका असून १४०२ पैकी ८६१ जणांना अद्याप फेलोशिपसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, असा आरोप युवा ग्रॅज्युएट फोरमतर्फे अतुल खोब्रागडे यांनी केला आहे.
सारथीचे लाभार्थी
२०१९ ३७७+१४६ वाढीव
२०२० २०७
२०२१ ५५१
२०२२ ८५१
महाज्योतिचे लाभार्थी
२०१७-२०२१ ७५१ २०२२-२३ १२९१
सन विद्यार्थी
२०१२ ५
२०१३ १६
२०१४ १०१
२०१५ १५६
सन विद्यार्थी
२०१६ १०७
२०१७ १००
२०१८ ४०८
२०१९+२०२० ५०९
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.