Bleaching Powder Used For Fishing: आकाराने लहान असलेले मासे अतिशय चपळ असतात. जाळ्यातही लवकर येत नाहीत. त्यामुळे मासे पकडण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करण्याचे प्रकार सावनेर तालुक्यात घडत आहेत. हे मासे आरोग्यासाठी धोकादायक आहेत. मत्स व अन्न प्रशासनाचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
मासे हे पौष्टिक अन्न असून प्रथिनांचे प्रमाणही भरपूर आहे. ग्रामीण भागात मासे सेवन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. धरणांबरोबरच तलाव, नदी, नाले, डोह यामध्ये छोट्या आकाराचे मासे सापडतात. पावसाळा आणि हिवाळ्यात जाळे टाकून मासे पकडणे सहज शक्य होत असले तरी उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची पातळी कमी होत असल्याने जाळे टाकणे जिकरीचे होते. अशावेळी मासे पकडण्यासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जातो. असा पद्धतीने पकडलेले मासे शरीरासाठी हानिकारक असतात. सावनेर तालुक्यात अशा पद्धतीने मासे पकडण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत.
भाजलेले मासे थेट बाजारात
ब्लिचिंग पावडर टाकल्यानंतर मासे मृत होतात. हे मासे पकडल्यानंतर भाजले जातात. त्यानंतर थेट विक्रीसाठी बाजारात आणले जातात. किंमत कमी असल्याने गरीब लोकं भाजलेले मासे विकत घेतात. बाजाराच्या दिवशी भाजलेल्या माशांची अनेक दुकाने थाटलेली सहज दिसून येतात. (Latest Marathi News)
शरीरासाठी हानिकारक
ब्लिचिंग पावडर अर्थात कॅल्शिअम हायपोक्लोराईटचा वापर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी केला जातो. या पावडरमुळे मोठी हानी होत नसली तरी डोळे, घसा, त्वचा आदी अवयवांना इजा पोहचू शकते. माशांच्या मार्फत पावडरचे अंश पोटात गेल्यास पोटदुखी होण्याची शक्यता असते.
मासे पकडण्यासाठी जर ब्लिचिंग पावडरचा वापर होत असेल तर ही बाब चिंताजनक आहे. हे प्रकरण मत्स विभागाशी निगडित आहे. अशा माशांची विक्री करणे चुकीचे असून बाजारात जाऊन खात्री केल्या जाईल. दोषी आढळल्यास कारवाई केल्या जाईल.-क्रिष्णा जयपुरकर, सहआयुक्त, अन्न व प्रशासन विभाग, नागपूर
‘ब्लिचिंग’ पावडरमधील क्लोरिन गॅस पाण्यातील इतर जलचर प्राण्यांसाठी हानिकारक ठरु शकते. माशांच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात. त्यामुळे मासेमारीसाठी ब्लिचिंग पावडरचा वापर करू नये, यासाठी जनजागृती केली जाईल.-सुहास जांबुळे, उपआयुक्त, प्रादेशिक मत्स्यव्यवसाय विभाग,नागपूर (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.