Video : स्कूलबसने विद्यार्थ्यांना चिरडलं! १४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

Nagpur School bus Accident 14-year-old student crushed to death by a school bus in Nagpur
Nagpur School bus Accident 14-year-old student crushed to death by a school bus in Nagpur
Updated on

Nagpur School bus Accident : नागपूरात स्कूल बस खाली येऊन एका शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघतात १४ वर्षाच्या सम्यक कळंबे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून यामध्ये ही स्कूलबस वाहनांना धडक देत पुढे येताना दिसत आहे. त्यानंतर ती एका विजेच्या खांबाला धडकून थांबल्याचे दिसत आहे.

खसाळा येथील मेरी पाऊसपिन्स अॅकेडमी या शाळेसमोर शाळेच्या बसने एका खासगी स्कुल व्हॅनला धडक दिली. त्यानंतर तीन विद्यार्थी बसच्या खाली आले. त्यांतील दोन मुले चाकांच्या गॅपमधून बाहेर पडले. पण एक मुलगा बससोबत घासत काही दूरपर्यंत गेला.या अपघातात विद्यार्थ्याला मार लागला तसेच त्याचे डोके आणि चेहरा रक्ताने माखला होता. पण नेमकी जखम कुठे झाली, ते समजू शकले नाही.

हेही वाचा - गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

Nagpur School bus Accident 14-year-old student crushed to death by a school bus in Nagpur
Navale Bridge Accident: अरे चाललंय काय! नवले पुलावर आज पुन्हा अपघात; दुभाजकाला धडकला कंटेनर

सर्वप्रथम स्कुल बसने स्कुटीला धडक दिली. त्या स्कुटीवरील महिला खाली पडली. तिला उचलायला एक विद्यार्थी सरसावला. पण तेवढ्यात स्कुल बसने खासगी व्हॅनला धडक दिली. त्यानंतर तिन मुले व्हॅनच्या खाली आली. दरम्यान एक ऑटो फसला होता. तो विद्यार्थी त्या ऑटोकडे धावला. त्यानंतर ज्या मुलगा जखमी झाला होता. त्याला उचलायला तोच विद्यार्थी आणि इतर काही जण धावले व त्याला शाळेच्या आवारात घेऊन गेले. नंतर शाळेत प्रथमोपचार करून जखमी विद्यार्थ्याला हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले.

Nagpur School bus Accident 14-year-old student crushed to death by a school bus in Nagpur
Maharashtra Politics: सरकार पडेल म्हणणाऱ्या राऊतांना शिंदे गटाचा खोचक टोला; म्हणे, "अहो, तुमचे…"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.