Nagpur : शेतकरी, महिला विज्ञान काँग्रेसचे उद्‍घाटन आज

राहीबाई पोपेरे, टिना अंबानी प्रमुख पाहुणे
Nun Popere elected to Central Government Committee
Nun Popere elected to Central Government Committeesakal
Updated on

नागपूर : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या तिसऱ्या दिवशी शेतकरी आणि महिला विज्ञान काँग्रेसचे उद्‍घाटन व बालविज्ञान संमेलन होणार आहेत. यासह विविध विषयांवरील परिसंवादांचे आयोजनही केले आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात सकाळी ९.३० वाजता शेतकरी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होईल. यावेळी पद्मश्री राहीबाई पोपेरे आयएससीएचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. अनुपकुमार जैन, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, पशू दुग्ध व मत्स्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर उपस्थित राहतील. मुख्य सभागृहात दुपारी दोन वाजत पद्मश्री राहीबाई पोपेरे, उद्योजिका टिना अंबानी, कांचन गडकरी यांच्या उपस्थितीत महिला विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन होईल. डॉ. एपीजे अब्दुल कलाम हॉलमध्ये सकाळी ९.३० सायं. ५.३० पर्यंत राष्ट्रीय बालविज्ञान संमेलनाचे कार्यक्रम होतील.

परिसंवाद

सकाळी नऊपासून परिसंवादांना सुरुवात होईल. त्यात डॉ. ए. के. डोरले (औषधी विज्ञान विभाग) सभागृहात ‘अंत:स्त्रावी आणि कर्करोग जीवशास्त्रातील प्रगती (इन एन्डोक्राइन ॲन्ड कॅन्सर बायॉलॉजी)’ हा परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी भुवनेश्वर येथील बिरला ग्लोबल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रेमंदू पी. माथूर राहतील. सहभागी वक्ते डॉ. मालिनी लालोराया (तिरुवनंतपूरम), प्रा. सुरेश येनुगू (हैद्राबाद विद्यापीठ), डॉ. शाहीद उमर.

डॉ. रामानुजन (गणित विभाग) सभागृहात ‘सृजनात्मक संशोधन आणि कोविड नियंत्रणासाठी नियोजन आणि भविष्यातील विषाणूची महामारी’ विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी सोनीपत (हरियाणा) येथील एसआरएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. राजाराजन असतील. सहभागी वक्ते प्रा. एस. पी. त्यागराजन (कोईम्बतूर), प्रा. डॉ. अभय चौधरी (हाफकिन इन्स्टिट्यूट मुंबई), डॉ. शांथी साबरी (ऑस्ट्रेलिया)

रसायनशास्त्र विभागात मानवी आरोग्यात ग्लायकोबायोलॉजीचा परिणाम, रोग आणि कर्करोग उपचारपद्धती विषयावर परिसंवाद होईल. कोलकत्ता (पश्चिम बंगाल) येथील वेस्ट बेंगॉल युनिव्हर्सिटी ऑफ टेकालॉजीचे प्रा. बी. पी. चटर्जी अध्यक्षस्थानी राहतील. सहभागी वक्ते डॉ. विष्णुपाद चॅटर्जी (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कोलकता), डॉ. हाफीज अहमद (अमेरिका), प्रा. दीपक बॅनर्जी (अमेरिका), प्रा. यासूहिरो ओझेकी (जपान).

गुरूनानक भवन येथे सकाळी ९.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.०० ते ४.०० दरम्यान आरएफआरएफ यांचे विशेष सत्र आयोजित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.