Nagpur : उपचारासाठी दिवसभर विकते सूप, टोपल्‍या; एक देवदूत धावून येतो अन्...

तीन वर्षांपासून मेडिकलमध्ये येते. उपचारादरम्यान तिच्या कुटुबांचा महिनाभराचा संसार परिसरातील झाडाखाली फुलतो.
need hospital help
need hospital helpSakal
Updated on

नागपूर - सोजराबाई मौर्य या पन्नाशीकडे झुकलेल्या. घरी अठराविश्‍वे दारिद्य्र तरी जगण्यासाठी तिचा संघर्ष कायम आहे. त्यातच आजाराने विळखा घातला. आजार बरा व्हावा, वेदनेतून मुक्ती मिळावी यासाठी तिची धडपड.

कुटुंबासह मेडिकलच्या आवारातच रात्र काढते. सकाळ झाली की, सूप-टोपल्या, सजावटीचे साहित्य विकून आलेल्या मिळकतीवर तीन वर्षांपासून मेडिकलमध्ये उपचार घेते. कधीतरी दुःखाची छाया दूर होईल, हीच तिची आशा आहे.

need hospital help
Nagpur News: देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर विदर्भवाद्यांचे आंदोलन! नेमकं कारण काय?

सोजराबाई मूळची छिंदवाडा जिल्ह्यातील एका लहान गावची. तीन मुली, एक मुलगा, नातवंड असा संसार. बांबूपासून सूप-टोपल्या, सजावटीच्या वस्तू बनवून विकणे, हे त्यांच्या जगण्याचे साधन. दुसऱ्याचं घर सजवणाऱ्या सोजराबाईला स्वतःच्या आयुष्याला ठिगळ लावता आले नाही. सहज तिला बोलत केलं, ती म्हणते, भाऊ, सूप-टोपल्या विकल्या तरच रात्री चूल पेटते, नाहीतर उपाशी राहण्याची वेळ येते.

need hospital help
Mumabi Airport Threat Call : मुंबई विमानतळ उडवून देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या

तीन वर्षांपासून मेडिकलमध्ये येते. उपचारादरम्यान तिच्या कुटुबांचा महिनाभराचा संसार परिसरातील झाडाखाली फुलतो. तिला पोटाचा आजार आहे. तपासणी झाली. सोनोग्राफीसाठी बोलविले होते.

डॉक्‍टरांकडून उपचारांऐवजी तीन वेळा तारखेवर तारीख मिळाली होती. मिळालेल्या तारखेवर बिच्चारी सोजराबाई वेदनेचे गाठोडे घेऊन हजर होते. परिसरातील रस्त्यावर सुप-टोपल्यांचे दुकान ती लावते. कधी -कधी त्यांची नात टोपल्या विकते. आजी डॉक्टरकडे गेली असे सांगत, चिमुकली नात ‘टोकनी लो बाबूजी'' असे बोबड्या बोलाने आर्जव करते, तेव्हा काळीज पिळवटते.

need hospital help
Mumbai : भिवंडी सीरिया करण्याचा कट! तपासात धक्कादायक खुलासा

नुकतेच उपचार होऊन ती बरी झाली, महिनाभरबाद डॉक्टरने बुलाया है, असे सांगत सुप-टोपल्यांचा संसार घेऊन ती छिंदवाड्याला रवाना झाली. जाताना मात्र मेडिकलमधील गरिबांसाठी धावून येणाऱ्या डॉ. मुरारी सिंग यांचा निरोप घ्यायला ती विसरली नाही.

need hospital help
Mumbai : डोंबिवलीतील शिवसेना शिंदे गटातील एक 'मोठा' पदाधिकारी फेरीवाल्यांकडून हप्ते घेतो; आमदार राजू पाटीलांचा गौप्यस्फोट

एक देवदूत धावून येतो...

सोजराबाई दारिद्य्र रेषेखाली येते. ती मध्यप्रदेशात राहाते. आयुष्यमान योजनेत मोफत उपचाराची सोय आहे, परंतु यादीत नाव नाही.

महाराष्ट्रातील बीपीएल कार्ड नसल्याने औषध व साहित्याचे पैसे मोजावे लागतात. सरसकट बीपीएल योजनेचा लाभ तिला मिळाला, तर दुःख थोडे दूर होऊ शकेल.

डॉ. मुरारी सिंग.
डॉ. मुरारी सिंग. Nagpur Sakal

मेडिकलमधील एक देवदूत नेहमीच धावून येत असल्याचे सोजराबाई सांगतात. त्या देवदूताचे नाव डॉ. मुरारी सिंग. नेहमीच पैशापासून तर सोनोग्राफी विभाग असो की, डॉक्टरला तपासण्यासाठी मदत करतात. कधी-कधी औषध विकत घेऊन देतात. हे सांगताना सोजराबाईचे डोळे भरून आले. पदर डोळ्यांना लावत ती नजरेआड झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()