Gajanan Maharaj: संतनगरीत गण गण गणात बोतेचा गजर! ‘श्रीं’च्‍या प्रगटदिनी लाखो भाविक नतमस्‍तक, उत्‍सव मोठ्या उत्‍साहात साजरा

विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आज (ता.३) श्रीं चा १४६ वा प्रगटदिन उत्‍सव मोठ्या उत्‍साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
Gajanan Maharaj
Gajanan MaharajEsakal
Updated on

Vidarbha Pandhari Shegaon Gajanan Maharaj Birth Anniversary : विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावमध्ये आज (ता.३) श्रीं चा १४६ वा प्रगटदिन उत्‍सव मोठ्या उत्‍साहात व विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी राज्‍यभरातून व राज्‍याबाहेरुन देखील भाविकांनी श्रीं च्‍या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी अवघी संत नगरी भाविकांनी फुललेली दिसली. फुलांनी सजविण्यात आलेले श्रीसंत गजानन महाराजांच्‍या मंदिराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते.

श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये वर्षभरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात यामधील मुख्य सोहळा म्‍हणजे श्री संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन होय. या सोहळ्यानिमित्‍त राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक मोठ्या संख्येने संतनगरीत दाखल होत असतात.

श्रीं प्रगट दिन सोहळ्यास श्री महारूद्र स्वाहाकार यागाने २५ फेब्रुवारी रोजी सुरवात झाली होती. तर आज (ता.३) सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती झाली. तसेच ''श्रींच्या प्रागट्टया'' निमित्‍त १० ते १२ वाजेदरम्‍यान श्रीहरी कीर्तन पार पडले. तर सांयकाळी श्रींच्या रजत मुखवट्यासह पालखी अश्व, रथ, मेणा भगवे पताकाधारी वारकरी यांच्यासह नगर परिक्रमेसाठी निघाली. यावेळी महात्मा फुले बँकेसमोरून, महात्मा फुले चौक, श्रीसंत सावता माळी चौक, हरीहर मंदिर, भीम नगर (तीन पुतळा परिसर), फुले नगर, श्री प्रकटस्थळ, सीतामाता मंदिर, श्री लायब्ररी या मार्गे परिक्रमा करीत पालखी मंदिरात परतली. (Latest Marathi news)

श्रींच्या रजत मुखवट्याची प्रकटदिनी नगर परिक्रमा निघाल्याने संतनगरीत भक्तीभावाचे वातावरण पाहावयास मिळाले. दरम्यान, शहरवासीयांनी परिक्रमेच्या मार्गावर सडासंमार्जन करून तसेच रांगोळ्या काढून पालखीचे उत्साहात स्वागत केले. पान २ वर यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवात १,०३२ दिंड्या व एकूण ४६,७०१ वारकरी येऊन गेलेत. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरुस्ती करिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरीता सहयोग देण्यात आला.

Gajanan Maharaj
IPL 2024 : रोहितनंतर 'या' खेळाडूची कर्णधारपदावरून हकालपट्टी! फ्रेंचायझीने केली मोठी घोषणा, 'या' स्टारकडे संघाची धूरा

तसेच उत्सवानिमित्य आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकुल येथे करण्यात आली. तसेच उत्सव काळात श्री शेगांवसह श्री शाखा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन २,२२,००० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. उद्या ४ मार्च सोमवार रोजी सकाळी ७ ते ८ हभप प्रमोदबुवा राहणे यांचे काल्याचे कीर्तन, दहीहंडी व गोपालकाल्याने या प्रगटदिन उत्सवाची सांगता होईल. (Latest Marathi news)

उत्‍सवादरम्‍यान यांची झाली कीर्तने

सप्ताहात ह.भ.प. विठ्ठल बुवा नवले, घाटबोरी, श्रीह.भ.प. प्रशांत बुवा ताकोते, सिरसोली, श्रीह.भ.प. गोपाल बुवा सांदुरीकर, दुरी, ह.भ.प. केशव बुवाउलीक, लासुर्णी, ह.भ.प. समाधान बुवा शास्त्री, केज, ह.भ.प. संदीप बुवा डुमरे, कल्याण, ह.भ.प. ज्ञानेश्वर बुवा कुन्हाडे श्री क्षेत्र आळंदी, ह.भ.प. भरत बुवा पाटील, म्हैसवाडी आदि कीर्तनकारांचे कार्यक्रम संपन्न झाले.

अडीच हजार पोलिस कर्मचारी बंदोबस्‍तात

शेगावमध्ये पालखी सोहळ्यात महिलांची आणि लहान बालकांचा वाढता समावेश पाहता. यावर्षी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने खबरदारी घेत बंदोबस्तासाठी जवळपास २५०० पोलीस कर्मचारी तैनात होते.

Gajanan Maharaj
Asim Sarode Alleged Cm Eknath Shinde MLAs: एअर हॉस्टेसचा विनयभंग? गुवाहाटीमध्ये २ आमदारांना कुणी मारहाण केली? असीम सरोदे यांचे गंभीर आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.