Nagpur News : ‘स्मार्ट सिटी‘च्या धर्तीवर आता ‘स्मार्ट व्हिलेज’;नितीन गडकरी यांचा पुढाकार ,अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा

स्मार्ट सिटीच्या धरतीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या.
Nagpur News
Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : स्मार्ट सिटीच्या धरतीवर ‘स्मार्ट व्हिलेज’ निर्माण करावे आणि गरिबांना स्वस्त दरात सर्व सुविधा मिळाव्यात, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला दिल्या. ‘स्मार्ट व्हिलेज’चा प्रकल्प कसा असेल, याच्या संकल्प चित्रांचे प्रेझेंटेशनही गडकरी यांना देण्यात आले.

नितीन गडकरी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या प्रकल्पावर आज झालेल्या बैठकीत ‘स्मार्ट व्हिलेज’चे व्हीजन मांडले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर उपस्थित होते. स्मार्ट व्हिलेजमध्ये स्वस्त दरातील घरकुल, सौरऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली, शाळा, जलकुंभ, खेळाची मैदाने, वैद्यकीय सोयीसुविधा, दैनंदिन गरजा आदींचा समावेश राहणार आहे. गडकरी यांनी संकल्पना समजावून सांगताना सोयीसुविधांच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या. त्याचवेळी ‘स्मार्ट व्हिलेज’साठी जागेची निवडी संदर्भातही गडकरी यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

उद्योग, शिक्षण, आरोग्य व्यवस्था या सर्वांनी परिपूर्ण असे ‘स्मार्ट व्हिलेज’ अस्तित्वात आले तर खेड्यातील लोकांचे स्थलांतर थांबेल. विकासातील अडसर दूर होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास कुटुंबांना स्वस्त दरात सुंदर घर मिळाले, आयुष्यभर वीज व पाणी मोफत मिळाले, गावात उत्तम शाळा झाल्या, उद्योग पोहोचले, सर्व सुविधा मिळाल्या तर खेड्यातून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाण कमी होईल. त्यादृष्टीने ‘स्मार्ट व्हिलेज’ची योजना तयार करावी अशा सूचनाही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.