नागपूर : सोयाबीनचा पेरा आणखी घटणार

रोग व किडींमुळे उत्‍पादनात घट
सोयाबीन
सोयाबीनsakal
Updated on

जलालखेडा : सोयाबीनचे दरवर्षी होणाऱ्या शंभर टक्के नुकसानामुळे मागील चार वर्षांपासून खरिपात सोयाबीनचे पेरणी क्षेत्र घटत आहे. यावर्षी कृषी विभागाने नरखेड तालुक्यात ५५०० हजार हेक्टरमध्ये सोयाबीन पेरणीचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्ष पेरणी मात्र यापेक्षा ही कमी होणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. नरखेड तालुक्यात सोयाबीनचे न होणारे उत्पादन हे आता शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागले आहे. यामुळे तालुक्यातून सोयाबीनची हद्दपार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नरखेड तालुक्यात ४६९३८ हेक्टर शेतजमिनीवर सन २०२२-२३ च्या खरीप हंगामाचे नियोजन नरखेड तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. सतत तालुक्यात सोयाबीन पेरणी क्षेत्र कमालीचे घटत आलेले आहे. यावर्षीही ते मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रोग व किडींचा प्रादुर्भाव व बाजारात मिळणारा कमी अथवा सरासरी दर पाहता, सोयाबीनचे पीक घेणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजोगे नाही. त्यामुळे आपण सोयाबीनचे पीक घेणार नाही, अशी माहिती नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली.

यंदा कपाशीच राहणार शेतकऱ्यांची पसंती

यावर्षी कापसाचे उत्पादन सरासरी कमी झाले असले, मात्र मिळालेला भाव व सोयाबीनचे दरवर्षी होणारे शंभर टक्के नुकसान, यामुळे शेतकरी आता कंटाळला आहे व यामुळेच त्याचा कल यावर्षी कापसाकडे राहण्याची शक्यता अधिक आहे. २०२१-२२ खरीप हंगामात कापसाची पेरणी २४,६३५ हेक्टर मध्ये झाली होती. तर यावर्षी हे क्षेत्र वाढून २८,५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तालुका कृषी विभागाने आगामी खरीप हंगामासाठी ४६ हजार ९३८ हेक्टरवर विविध पिकांचे नियोजन केले आहे. यात कपाशीचे पीक आघाडीवर असून, तुरीचे पीक दुसऱ्या, तर सोयाबीनचे पीक तिसऱ्या स्थानावर आहे. खरीप हंगामात बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. कृषी विभाग बियाण्यांसह रासायनिक खतांची तजवीज करण्याच्या कामाला लागले आहे.

सोयाबीनचे क्षेत्र ३००० ते ४००० हेक्टरने घटणार

२०२०-२१ च्या खरीप हंगामात १५८३८ हेक्टरमध्ये तर सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात ८७३६ हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. या दोन वर्षात तालुक्यात सोयाबीन पेरणी क्षेत्र ७,००० हेक्टरने घटले. यावर्षी (सन २०२२-२३ चा खरीप हंगाम) कृषी विभागाने तालुक्यात ५ हजार ५०० हेक्टर मध्ये सोयाबीन पिकाच्या पेरणीचे नियोजन केले असले तरी वास्तवात पेरणी यापेक्षा कमी हेक्टरमध्येच होणार असल्याने तालुक्यातील सोयाबीनचे क्षेत्र ३००० ते ४००० हेक्टरने घटणार आहे, अशी माहिती तालुक्यातील काही प्रमुख सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()