Nagpur Swine Flu : स्वाइन फ्लूचे मृत्यू किती?

दोन महिण्यात रुग्णांची संख्या ५०२ वर; आरोग्य विभाग निष्क्रय
Nagpur Swine Flu
Nagpur Swine Flu
Updated on

नागपूर : कोरोना आता पुर्णपणे आटोक्यात आला आहे. मात्र स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मागील दोन दिवसांत स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण आढळले. तर, या आजाराने मागील पंधरा दिवासात किती मृत्यू झाले याची आकडेवारी अद्याप आरोग्य विभागाने जाहीर केली नाही. आतापर्यंत स्वाइन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीने विभागात केवळ २५ मृत्यूंवर शिक्कामोर्तब केला आहे. मात्र प्रत्यक्षात पन्नासपेक्षा अधिक मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती आहे.अवघ्या दोन महिन्यात स्वाइन फ्लूचे ५००वर रुग्ण आढळले आहेत.

मागील ४८ तासांमध्ये उपराजधानीत ११ स्वाइन फ्लू बाधित आढळले आहेत. तर जिल्ह्याबाहेरचे ३ रुग्ण आहेत. असे १४ स्वाइन फ्लूबाधित आढळले आहेत. यामुळे आतापर्यंतच्या स्वाइन फ्लूबाधितांचा आकडा ५०२ वर पोहचला आहे. नागपुरात स्वाइन बाधितांची संख्या २७१ झाली. तर नागपूर ग्रामीणमध्ये ८७ जण स्वाइन फ्लूबाधित आढळले आहेत. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या १४४ आहे. शहरात आजपर्यंत १८१, ग्रामीण ५५, जिल्ह्याबाहेरील ८१ अशा एकूण एकूण ३१७ स्वाइन फ्लूच्या रुग्णांनी या आजारावर मात केली आहे.

तर महापालिकेचा आरोग्य विभाग तसेच नागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालय यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार शहरी भागात १०, ग्रामीण भागात ११, जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण २५ स्वाइन फ्लूच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. मात्र प्रत्यक्षात हा मृत्यूचा आकडा पन्नासवर गेला असल्याची माहिती आहे. मेडिकलमध्येच आतापर्यंत ३३ जण या आजाराने दगावले आहेत. तर मेयो रुग्णालयात ५ जण दगावले आहेत. शनिवारी (ता.१०) शहरी भागातील ८०, ग्रामीमचे २९, जिल्ह्याबाहेरील ५२ असे एकूण १६१ स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचार घेत असून १६ जण व्हेंटिलेटवर हेत.

दोन दिवसात कोरोनाचे ३३ बाधित

जिल्ह्यात मागील दोन दिवसांत १५५६ चाचण्या झाल्या. त्यापैकी केवळ ३३ जण कोरोनाबाधित आढळले. तर ४१ जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत शहरात १८१ आणि ग्रामीणमध्ये ५३ असे जिल्ह्यात २३४ सक्रिय कोरोना कोरोनाबाधित आहेत. यापैकी २२१ जणांना लक्षणे नसल्याने ते गृहविलगीकरणात आहेत. तर लक्षणे असलेले १३ जण मेडिकल, मेयोसह इतर कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.