Nagpur: एक कोटी घ्या विधानपरिषदेत प्रश्न विचारायचा नाही, आमदार मिर्झांची होणार ACB चौकशी

एसीबीकडून सर्व साक्षीदारांच्या बयाणांची होणार तपासणी
Nagpur
Nagpuresakal
Updated on

नागपूर: विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आमदाराच्या नावे आरटीओकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात गुरुवारी (ता.४) एसीबीने विधानपरिषदेचे कॉंग्रेसचे पुसद येथील आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची एसीबीने आठ तास चौकशी केली.

आता त्यांनी दिलेली साक्ष आणि इतरांची साक्ष तपासून त्यात फरक आढळल्यास आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

Nagpur
Sharad Pawar: 'शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम...',राजीनाम्याच्या निर्णयावरून शिवसेनेच्या आमदाराचा टोला

दीड महिन्यांपूर्वी रविभवन परिसरात दिलीप वामनराव खोडे (वय ५० रा. वूड रोज हिरानंदानी मिडास,वसंत विहार, ठाणे) याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहात अटक केली. एसीबीच्या पथकाने न्यायायलात हजर करून त्याची १ एप्रिलपर्यंत एसीबी कोठडी घेतली. कोठडीत असताना खोडेची कसून चौकशी करण्यात आली.

याशिवाय तक्रारदार आरटीओचीकडेही पुन्हा चौकशी करण्यात आली. सुरुवातीला वारंवार खोडे हा तक्रारदार आरटीओच्या मोबाइलवर संपर्क करीत होता. त्याने दोन निवृत्त अधिकाऱ्यांनी आरटीओच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्याला खोडेशी बोलणे करायला लावले होते.

दरम्यान महिला अधिकाऱ्याने केलेली चारित्र्य हननाच्या तक्रारीचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात येणार आहे. हा प्रश्न उपस्थित न करण्यासाठी खोडे याने सुरुवातीला आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावे एक कोटीची लाच मागितली. त्यानंतर २५ लाख रुपये द्या, असे खोडे हा तक्रारदाराला म्हणाला.

Nagpur
Nana Patole: निमंत्रणच नाही बैठकींना यायचे कसे? नागपूर काँग्रेसमधली धुसफूस प्रदेशाध्यक्षांकडे

त्यातून या प्रकरणात डॉ. मिर्झा यांची चौकशी करण्याची शक्यता एसीबीकडून वर्तविण्यात येत होती. त्यानुसार गुरुवारी एसीबीद्वारे त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. आठ तास चौकशी केल्यावर त्यांची साक्ष नोंदविण्यात आली.

मात्र, आतापर्यंत या प्रकरणात आरोपींसह नोंदविण्यात आलेल्या इतर व्यक्तींची साक्ष आणि आमदार डॉ. मिर्झा यांची साक्ष यात तफावत आढळल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()