नागपूर : संत्रा उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी

गुणवत्तेअभावी संत्र्याच्या दरात विक्रमी घसरण
नागपुरी संत्रा
नागपुरी संत्राsakal
Updated on

नागपूर : सततच्या पावसामुळे आंबिया संत्र्यांचे उत्पादन कमी आहे. गुणवत्तेअभावी योग्य भाव मिळत नसल्याने नागपुरी संत्र्यांची चव फिक्की झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा संत्रा रस्त्याच्या कडेला फेकणे सुरू केले आहे. योग्य भाव नसल्याने विदर्भातील अनेक बाजार समित्यांच्या आवारात पडून असलेली संत्रीही सडू लागली असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. संत्र्याला पाच वर्षांनंतर प्रथमच अतिशय कमी भाव मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फळ आवक सुरू झालेली आहे. आज बुधवारी ३०० गाड्या संत्र्यांची आवक झाली. गुणवत्तेनुसार तीन ते १५ हजार रुपये टन भावाने संत्र्यांची विक्री झाली. नागपूरसह अमरावती जिल्ह्यातील संत्री उत्पादकांचा संत्रा कळमना मार्केटमध्ये येतो. कळमन्यात भाव कमी असतानाही किरकोळमध्ये संत्री जास्त भावात विकली जात आहेत. सध्या ४० ते ६० रुपये डझन भाव आहेत. नैसर्गिक आपत्ती आणि सततच्या पावसामुळे कीटकनाशकाचा (पतंग) प्रादूर्भाव झाल्यामुळे दोन तृतीयांश संत्री खराब झाली असून, केवळ अर्धा लाख टन संत्र्याचे उत्पादन येण्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत गेल्यावर्षी तीन लाख टनापेक्षा अधिक आंबिया संत्र्याचे उत्पादन झाले होते, असे संत्री उत्पादक हरिभाऊ पडोळे यांनी सांगितले.

नागपुरी संत्रा
गुणवंत, ज्ञानवंत आणि खूप मोठे व्हा, आई-वडिलांना विसरू नका

इंधनाचे वाढलेले भाव आणि बाजारात कमी भाव असल्याने नागपूर जिल्ह्यातील संत्रा शेतकऱ्यांना तोडणीला आणि वाहतुकीलाही परवडेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहेत. अनेकांनी संत्र्यांची तोडणी थांबवली. यंदा संत्र्याचा अंबिया बहार मोठ्या प्रमाणावर आला आहे. संत्र्याचे उत्पादन त्यामुळे चांगले झाले. सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. कापसाला योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतित होते. आता संत्र्याला योग्य बाजारभाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र तसे झाले नाही. मातीमोल दराने संत्री खरेदी केला जात आहे. त्यामुळे संत्री विकण्यासाठी आणणेही शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे असेही पडोळे म्हणाले.

नागपुरी संत्रा
पावस : किल्ल्याने केले आकृष्ट; नजारे दिसले उत्कृष्ट

इंधनाचे दर आकाशाला भिडले आहे. दुसरीकडे योग्य भाव मिळत नसल्याने बाजारात संत्री बाजारात आणण्यासाठी शेतकऱ्यांना ‌आपल्या खिशातून पैसे खर्च करावे लागत आहेत. त्यामुळे अनेकांनी जोवर योग्य भाव मिळत नाही, तोवर तोडणी करायची नाही, असा निर्णय घेतला आहे. परिणामी संत्री झाडालाच आहेत. त्यामुळे त्याची गळती सुरू आहे. खराब झालेल्या संत्र्यांची बाजाराच्या परिसरातून विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न आहे. शासनाने संत्री उत्पादकांना आर्थिक मदत करावी.

-स्वप्निल मांडळे, शेतकरी

संत्र्यांची गुणवत्ता अतिशय सुमार असल्याने भावात विक्रमी घट झाला आहे. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी जो भाव होता त्या दरात संत्र्यांची विक्री केली जात आहे. कळमना बाजारातून छत्तीसगड, आंध्रप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेशात संत्र्यांची मागणी केली जाते. यंदा गुणवत्ता चांगली नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

-राजा मेनानी, संचालक, राधास्वामी फ्रूट कंपनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.