Telegram Fraud: हजार कमवायच्या नादात लाखो गमावले! टेलिग्रामवर टास्क पूर्ण केल्यावर मिळणार होती बक्कळ रक्कम, पण झालं भलतच

टास्कच्या नावावर एका खासगी काम करणारे धीरज सुधाम कारडीकर (वय ३७, रा. राणी दुर्गावती चौक) यांना सायबर चोरट्याने २ लाख ३८ हजाराने गंडविले.
Telegram Fraud: हजार कमवायच्या नादात लाखो गमावले! टेलिग्रामवर टास्क पूर्ण केल्यावर मिळणार होती बक्कळ रक्कम, पण झालं भलतच
Updated on

Nagpur Telegram Fraud Case: टास्कच्या नावावर एका खासगी काम करणारे धीरज सुधाम कारडीकर (वय ३७, रा. राणी दुर्गावती चौक) यांना सायबर चोरट्याने २ लाख ३८ हजाराने गंडविले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरला धीरज यांच्या मोबाईलवर मॅसेज आला. त्यात ‘cluter-7705’ या टेलिग्राम आयडीवर त्यांना एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले. प्रथम त्यांना टास्क देत, त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे त्यांनी दिलेला टास्क पूर्ण करण्यास सुरुवात केली.

प्रथम त्यांना नफा देत, अधिकचा पैसा गुंतविल्यास अधिक नफा मिळेल असे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी वेगवेगळया अकाऊंटमध्ये एकुण २ लाख ३४ हजार रुपये ऑनलाइन पाठविले. मात्र, त्यानंतर नफा आणि दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे कळताच, त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार दिली. दरम्यान पाचपावली पोलिसांनी याप्रकरणी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Telegram Fraud: हजार कमवायच्या नादात लाखो गमावले! टेलिग्रामवर टास्क पूर्ण केल्यावर मिळणार होती बक्कळ रक्कम, पण झालं भलतच
Milind Deora Resigns: सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाण्याआधी मिलिंद देवरांची माध्यमांना प्रतिक्रिया म्हणाले, 'मी विकासाच्या...'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()