Nagpur : ‘गण गण गणात बोते’च्या गजराने परिसर दुमदुमणार

गजानन महाराज मंदिरांत ऋषी पंचमीची तयारी जोमात
gajanan maharaj
gajanan maharajsakal
Updated on

नागपूर - गजानन महाराजांच्या ऋषी पंचमी सोहळ्याचे आयोजन शहरातील विविध मंदिरात करण्यात आलेले आहे. त्यानिमित्ताने महाप्रसाद, लघुरुद्र, गोपाल काला व भजनांचे कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने परिसरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. अनेक ठिकाणी पालखी मिरवणुका काढण्यात येणार असल्याने ‘गण गण गणात बोते’च्या गजराने परिसर दुमदुमणार आहे.

श्री सदगुरू गजानन महाराज सेवाभावी मंडळ आणि समस्त भक्तगणांतर्फे त्रिमूर्ती नगरातील तलमले इस्टेट येथील संत श्री गजानन महाराज मंदिरात २० सप्टेंबरला ऋषी पंचमीनिमित्त समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता इंदूताई नत्थुजी तलमले यांच्या परिवारातर्फे लघुरुद्र होणार आहे. त्यानंतर भजन आणि गोपाल काला होईल. रात्री आठ वाजता गुरुदेव सेवा मंडळ, अध्यापक ले आउट येथील भजन होणार आहे.

२१ सप्टेंबरला संतकृपा वारकरी भजन मंडळ गोपालनगरचे भजन आहे. तत्पूर्वी हरिपाठ आणि रामरक्षा होईल. सायंकाळी सात वाजता महाप्रसादाने समाधी दिन सोहळ्याचा समारोप होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे सेवेकरी राजू तलमले, विजय कन्हेरे, केशव कोसे, प्रमोद जोशी, दत्ता वझलवार, नरेंद्र जगदाळे, युवराज मोटघरे, गोविंद डोंगरे, जयेश मोटघरे, नरेंद्र शेळके प्रयत्न करीत आहे.

gajanan maharaj
"कोरोनावरील 2 DG औषध सर्व व्हेरियंट्सवर प्रभावी"

नागलवाडीतील गजानन मंदिरात ऋषी पंचमी

वानाडोंगरी वडधामना रोड येथील नागलवाडीतील श्री सद्‍गुरू महाराज मंदिरात २० सप्टेंबरपर्यंत श्री गजानन महाराज मंदिर नागलवाडी येथे ऋषीपंचमी उत्सवाचे आयोजन केले आहे. सकाळी ६.३० वाजता काकड आरती, महापूजा, पंचसूकताभिषेक, महानैवेद्य अर्पण व महाआरती व १२.३० वाजतापासून महाप्रसादाचे वितरण केले जाईल. सायंकाळी पाच वाजता हरिपाठ, नंतर पालखी मिरवणूक निघणार असून सायंकाळी साडेसात वाजता आरती, सत्संग व महाप्रसादाचे वितरण होणार आहे, असे सचिव महेश कुळकर्णी यांनी कळविले आहे.

gajanan maharaj
Nagpur : ८६८ गणेश मंडळांची अवैध वीज जोडणी

रेशीमबागेत श्रींचा पुण्यतिथी उत्सव

रेशीमबाग येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धास्थानात बुधवारी (ता.२०) ऋषी पंचमीला समर्थ सद्‍गुरू श्री गजानन महाराज याची पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. सकाळी नऊ वाजता श्री गजानन महाराज यांना मंगलाभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर संतकवी कमलासूत रचित संत गजानन अवतरणिकाचे सामुहिक पारायण व श्री गजानन विजय ग्रंथातील १९ व्या अध्यायाचे सामुहिक पठण होणार आहे. ऋषी पंचमीची कथा झाल्यानंतर महाराजांना मंगल आरती करण्यात येईल. त्यानंतर एक वाजतापासून महाप्रसादाचे वाटप होणार आहे. सांयकाळी ६.३० वाजता गीत गजानन होईल. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन गिरीश वऱ्हाडपांडे यांचे आहे.

gajanan maharaj
Nagpur ZP School : जिल्हा परिषदेच्या आठ टक्के शाळांचीच पटसंख्या शंभरावर!

विकास नगरात समाधी सोहळा

श्री संत गजानन महाराज आध्यात्मिक सेवा मंडळातर्फे गजानन महाराज समाधी सोहळा २० सप्टेंबरला आहे. दरम्यान, लघुरुद्र, गजराचा कार्यक्रम आहे. २१ सप्टेंबरला गोपालकाला असून राम महाराज अकोला यांचे कीर्तन आहे. दुपारी १ वाजतापासून महाप्रसादाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष सुभाष अपराजित, सचिव रामराम चौधरी, उपाध्यक्ष प्रदीप तलमले, सहसचिव राजेंद्र साबळे, कोषाध्यक्ष अशोक दशसहस्र यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.