नागपूर : ऑक्सिजन प्लांटच्या देखभालीचे संकट

देखभालीसाठी लागणार वर्षाला २ कोटींचा खर्च
Nagpur the oxygen plant Maintenance Crisis
Nagpur the oxygen plant Maintenance Crisisoxygen plant
Updated on

नागपूर : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचे संकट ओसरल्यानंतर तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत मेडिकलमध्ये हवेतून ऑक्सिजन (oxygen) तयार करणारे तीन प्लांटचे काम सध्या पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे. पण, प्लांटच्या देखभाल दुरुस्तीचे नवे संकट उभे ठाकले आहे. वीजबिलासह या प्लांटच्या देखभालीचा खर्च वर्षाकाठी किमान दोन कोटींवर जाणार असल्याची माहिती आहे.

Nagpur the oxygen plant Maintenance Crisis
नागपूर : हजारो विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज धोक्यात

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटचे संकट पुढे उभे ठाकले असताना मेडिकलच्या कोविड हॉस्पिटल परिसरात उभारलेला ३ हजार २०० एलपीएमचा प्लांट विद्युत यंत्रणेअभावी अद्यापही सुरू होऊ शकला नाही. या प्लांटमधील काही त्रुटी पुढे आल्या आहेत. जोपर्यंत क्युरेटिव्ह अहवाल तंतोतंत जुळत नाही तोपर्यंत प्लांट सुरू होणे शक्य नाही. यात दुरुस्तीची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हा प्लांट विद्युत यंत्रणेशी जोडण्यासाठी हाय पॉवर विद्युत यंत्रणेची गरज आहे. दुसरे दोन प्लांट मेडिकलकडून शासकीय दंत रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर आहेत. येथील ३ हजार २०० एलपीएमचा एक आणि २ हजार एलपीएमचे दोन ऑक्सिजन प्लांट तयार झाले आहे. आता क्युरेटिव्ह रिपोर्टचे काम सुरू होईल. मेडिकलमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी दुसऱ्या लाटेत ९०० पेक्षा अधिक खाटा तयार करण्यात आल्या होत्या. सध्या कोविड हॉस्पिटलमध्ये २३० खाटा आरक्षित आहेत. हीच स्थिती मेयोतील ऑक्सिजन प्लांटसंदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Nagpur the oxygen plant Maintenance Crisis
नाशिक : शहरात रस्ते कामासाठी नियमबाह्य ‘क्लब टेंडर’

विभागीय आयुक्तांचे आदेश

दै. ‘सकाळ’ने मेडिकलमधील ऑक्सिजन प्लांट अर्धवट अवस्थेत असल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा तसेच जिल्हाधिकारी आर. विमला यांनी २ डिसेंबरला प्लांटची पाहणी केली. त्यांनी दहा दिवसांत प्लांट सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्याला पंधरा दिवस लोटून गेले. अद्यापही हे प्लांट सुरू झाले नाही. या प्रकल्पातून सातशे रुग्णांना एकाचवेळी ऑक्सिजन मिळू शकणार आहे, अशी माहिती आहे.

चुलीतील आगीचा धोका

मेडिकल परिरसरात रुग्णांचे नातेवाईक उघड्यावर राहातात. वॉर्डांच्या शेजारी तीन विटांवर चूल पेटवून रुग्णांचे नातेवाईक जेवण तयार करतात. नातेवाइकांच्या जेवणाची सोय नसल्याने हे प्रकार येथे सातत्याने होतात. तीन विटा लावून स्वयंपाक करण्यासाठी पेटविलेल्या चुलीतील आग ऑक्सिजन प्लांटसाठी धोक्याची ठरु शकते. यामुळे या प्लांटच्या सुरक्षेसाठी २४ तास येथे सुरक्षारक्षक तैनात ठेवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.