Nagpur News: ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नागपूरचे ब्रँडिंग

बैठक तंत्रज्ञान, पर्यावरणावर होणार चर्चा
G20 News, Nagpur News
G20 News, Nagpur Newssakal
Updated on

नागपूर : जी-२० च्या परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान यंदा भारताला मिळाला आहे. देशात याअंतर्गत अंदाजे २०० बैठका होणार आहे. एक बैठक मार्च महिन्यात नागपुरात होत आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. या बैठकीच्या निमित्ताने जागतिकस्तरावर ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नागपूरचे ब्रांडिंग करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने तयारीला वेग आलेला आहे.

२१ व २१ मार्चला दोन दिवस बैठक होतील. बैठकीला २९ देशातील ६०,७० प्रतिनिधी अधिकारी अधिकाऱ्यांसह देशभरातील २०० गणमान्य व्यक्ती येथे येतील. नागपुरात होणाऱ्या बैठकीला सिव्हिल -२० असे नाव देण्यात आले आहे. याचे सभापतीपद केरळच्या अमृता आनंदमयी यांच्याकडे देण्यात आले आहे. आध्यात्माशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते.

तर इतर व्यवस्थेची जबबादारी रामभाऊ म्हाळगी परिषद व विवेकानंद फाउंडेशनकडे असणार आहे. या सिव्हील-२० च्या बैठकीत टेक्नॉलॉजी, पर्यावरणाशी संबंधित तसेच इतर विषयांवर चर्चा होईल. या माध्यमातून पुढे येणारे मुद्दे, सूचना जी-२० च्या परिषदेला कळविण्यात येणार आहे. त्यामुळे ही सिव्हील-२० बैठक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात येते. या बैठकीच्या माध्यमातून नागपूरचे ‘कॅपिटल ऑफ इंडिया’ असे ब्रांडिंग करण्यात येणार आहे. २१ व २२ मार्चला होणाऱ्या बैठकीसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात येत आहे.

‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नागपूरचे ब्रांडिंग

आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी तसेच दुरुस्तीकामासाठी केंद्र शासनाकडून निधीही देण्यात आला आहे.

पाहुण्यांसाठी विशेष कार्यक्रम, भेटी

पहिल्या दिवशी म्हणजे २१ मार्चला पाहुण्यांना फुटाळा येथील संगीतमय फाउंटेन दाखविण्यात येणार आहे. त्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येईल. रुझवेल्ट कपलिंग यांच्या जंगल बुकमधील मोगली कॅरेक्टरमुळे जागतिक पातळीवर पोहचलेल्या पेंच प्रकल्पातील व्याघ्र दर्शनही त्यांना घडविले जाणार आहे.

बैठकीच सत्र संपल्यावर म्हणजे २३ मार्चला पेंच व चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाची जंगल सफारी प्रतिनिधींना करण्यात येणार आहे. त्याच दीक्षाभूमीसह इतर पर्यटन स्थळी दाखविण्यात येतील. जागेसंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झाला नाही.

- विजयालक्ष्मी बिदरी,विभागीय आयुक्त, नागपूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()