Nagpur : वाघाचा मागोवा घेणार ‘ॲप’पेंच प्रकल्पाने विकसित केले ‘टायगर मॉनिटरिंग ॲप’

आता मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून टायगर मॅनिटरिँग ॲप विकसित करण्यात आले आहे.
pench
penchsakal
Updated on

नागपूर - वाघांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ‘रेडिओ कॉलर’चा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता कक्षानिहाय वाघ कोणत्या परिक्षेत्रात भ्रमण करीत आहेत. त्याच्या वागणूक, हालचालीचा अंदाज घेण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात हाताने ‘टायगर मॉनिटरिंग रजिस्टर’ (टीएमआर) मध्ये नोंद केली जात होती.

आता मात्र, तंत्रज्ञानाचा वापर करून टायगर मॅनिटरिँग ॲप विकसित करण्यात आले आहे. ते लवकरच कार्यान्वित केले जाणार आहे. त्यात वाघ कोठून आला, त्याचा भ्रमणमार्ग कोणता, त्याची वागणुकीसह इतरही माहिती या नवीन प्रयोगामुळे कळत आहे. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे.

वन्यजीव सप्ताहानिमित्ताने पत्रकार अभ्यास दौऱ्यात पेंचचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी प्रकल्पात राबविण्यात येत असलेल्या विविध विकासावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, पेंच व्याघ्र प्रकल्पातील एक नव्हे तर ४४ वाघांवर हा प्रयोग केला जात आहे.

pench
Nagpur News : टेंशन घेऊ नको बाळा, फक्त प्रयत्न कर ! सामन्यापूर्वी आई अर्चनाने दिला होता ओजसला धीर

या आधारे त्यांच्या हालचालींचा अभ्यास करणे शक्य झाले आहे. क्षेत्रीयस्तरावर नियमित काम करणाऱ्यांना त्याचे प्रशिक्षण देण्यात आल्यानंतर त्याचा वापर केला जाणार आहे. जानेवारी २०२२ पासून प्रकल्पातील ७४ कक्षांमध्ये ‘टायगर मॉनिटरिंग रजिस्टर’ हा प्रयोग राबविण्यात येत आहे.

pench
Yuva Sangharsh Yatra : रोहित पवार महाराष्ट्राचे राहुल गांधी होऊ पाहत आहेत का?

ॲपमुळे कुठल्या क्रमांकाचा वाघ, कोणत्या क्षेत्रात भ्रमंती करीत आहे, बछडे आहे का हे कळू लागले आहे. ही माहिती अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे ती वनविभागाच्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना मिळू नये याची दक्षताही घेतली जात आहे. कक्षातील वनरक्षकच नव्हे तर वनमजूरही आता कोणता वाघ कुठे फिरत आहे हे सहज सांगू शकतात. ही नवीन प्रणाली अतिशय सुलभ आहे.

डॉ. प्रभुनाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

pench
Lee Sang Eun Death: परफॉर्मन्सच्या आधीच गायिकेचं निधन, वॉशरुममध्ये सापडला मृतदेह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.