नागपूर : नागपूर-सिकंदराबाद मार्गावर वंदे भारत ट्रेन धावण्याचे निश्चित झाले. रविवार (ता.१५)ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यागाडीसह १० वंदे भारतला हिरवी झेंडी दाखवणार आहे. अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. चेन्नईहून रवाना झालेली १६ डब्यांची वंदे भारत सोमवारी रात्री उशिरा अजनी यार्डमध्ये दाखल झाली. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कमालीची गोपनीयता बाळगली जात आहे.